यावेळी आमदार नाईक म्हणाले,शहरामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे,पंचायत समिती,ग्रामीण रुग्णालय ,शिराळा बस्थानाक यांच्या भव्यदिव्य इमारतींची उभारणी झाली आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीचा प्रश्न होता तो ही आता मार्गी लागला आहे. शिराळा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे जास्ती जास्त सोई सुविधा निर्माण करण्यावर सातत्याने भर दिला आहे.
यावेळी कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्र काटकर, तहसीलदार गणेश शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, उपनगराध्यक्ष विजय दवळी, नगरसेवक सुनीता निकम, सुनंदा सोनटक्के, मोहन जिरंगे, प्रमोद नाईक, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, उपअभियंता अतुल केकरे, इस्लामपूरचे सहायक अभियंता सुभाष पाटील,शाखा अभियंता पांडुरंग कदम, विश्वास नाईक बी. डी. पाटील, अजय जाधव,ऍड अक्षय कदम अशोक पाटील, सुशांत पाटील, प्रमोद पवार,बसवेश्वर शेटे उपस्थित होते.
0 Comments