जीवाची बाजी| लावून काम करणाऱ्यांचा |कोविड योद्ध म्हणून सन्मान | Honoring those |who work for their lives | as covid warriors
शिराळा : पर्यटनाच्या दृष्टीने शिराळा तालुका राज्याच्या नकाशावर आणायचा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान व परिसर, गुढे, पाचगणी पठारासह तालुक्यातील विविध ठिकाणे निसर्ग संपन्न आहेत. त्यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास साधून व्यावसायिक, उद्योग व रोजगार निर्मितीस प्राधान्य देणार आहे, प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यानी केले.
हे ही क्लिक करून वाचा- बेपत्ता सहा वर्षाच्या मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळला
जीवाची बाजी| लावून काम करणाऱ्यांचा |कोविड योद्ध म्हणून सन्मान | Honoring those |who work for their lives | as covid warriors
काळुंद्रे (ता. शिराळा) : येथे विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. ‘विश्वास’चे संचालक संभाजी पाटील, शिवाजी पाटील व तानाजी वनारे व तालुक्याचे उपसभापती बी. के. नायकवडी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, कोरोना महामारी काळात धोकादायक परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून विविध घटकांनी योगदान दिले. त्यांचा सन्मान काळुंद्रे ग्रामपंचायतीने केला, ही कौतुकास्पद बाब आहे. चांदोली धरण, वारणेचा कालवा कायम प्रवाही करण्याचे काम होत आहे. गुढे पाचगणी, चांदोली, पर्यटनाच्या नकाशावर आणायचा आहे. तालुक्यातील नैसर्गिक साधन संपत्ती यांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करून शिराळा पर्यटनाने समृध्द तालुका होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आरोग्य सुविधांचा विस्तारित झाला पाहिजेत. शेतकरी, कष्टकरी व युवक केंद्रस्थानी मानून कोरोना काळात ही विकासकामे सुरू आहेत. विकासकासात पश्चिम विभाग अग्रेसर ठेवण्याचे प्रयत्न राहतील.
जीवाची बाजी| लावून काम करणाऱ्यांचा |कोविड योद्ध म्हणून सन्मान | Honoring those |who work for their lives | as covid warriors
जिल्हाध्यक्ष नाईक म्हणाले, कोरोनाची परिस्थिती गंभीर होती. अनेक लोकांनी या काळात जीव धोक्यात घालून उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कामाचे कौतुक विजय पाटील यांनी केले आहे. पुरस्थितीही गंभीर होती. आपण एकापाठोपाठ एक संकटातून मार्ग काढत आहोत. तरीही विकासकामे जोमाने सुरू आहेत. गावागेवात वाडीवस्तीवर गरज असलेल्या भागात विकासकामे राबविली जात आहेत. युवकांत जागृती करून येणा-या काळात राष्ट्रवादी पुर्ण ताकदीने काम करणार आहे.
प्रारंभी सरपंच विजय पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. आरोग्य सेवेतील डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, व सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, आशा स्वयंसेविका, शिक्षक, शिक्षिका, पोलिस, भाजी विक्रेते, शिक्षक, किराना दुकानदार, पोस्टमन यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र, फेटा, महिलांना साडी देवून आमदार नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोकरूडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ तसेच गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल रमण खबाले, वकील झाल्याबद्दल निलम पाटील यांचा सत्कार झाला.
जीवाची बाजी| लावून काम करणाऱ्यांचा |कोविड योद्ध म्हणून सन्मान | Honoring those |who work for their lives | as covid warriors
दरम्यान 25/15 योजनेतून मंजूर झालेल्या दहा लाख रुपये खर्चाच्या ग्रामपंचायत ते कालेकर पाणंद पर्यंतचा काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ तर, आमदार स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेल्या 12 लाख खर्चाच्या उबाळेवाडी व वरची गल्लीतील रस्ता काँक्रीटीकरण कारणे या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन आमदार मानसिंगभाऊ यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव पाटील, सुहास पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, मांगल्याचे माजी सरपंच राहूल पवार, किनरेवाडीचे माजी सरपंच सदाशिव नावडे, पाचगणीचे सरपंच शंकर पाटील, मानेवाडीचे उपसरपंच कृष्णा माने, आरळ्याचे उपसरपंच सदाजी पाटील, कोंडीबा चौगुले, मोरेवाडीचे सरपंच अशोक डिगे, कुसळेवाडीचे संभाजी मस्कर, खराळेचे सरपंच प्रकाश बनसोडे, काशीदवाडीचे माजी उपसरपंच सखाराम काशिद, बोरगेवाडी उपसरपंच टी. डी. चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष डफळे, मोहरेचे भगवान पाटील, मणदूरचे बाळासो पाटील, अस्वलवाडीचे सरंपच शिवाजी खोत. ॲड. महेश शेडगे, युवराज पाटील, बेरडेवाडीचे महेश बेरडे, सुधिर पाटील, आनंदा पाटील, रामचंद्र देसाई, गणपती पाटील, मारुती कालेकर आदी उपस्थित होते.
जीवाची बाजी| लावून काम करणाऱ्यांचा |कोविड योद्ध म्हणून सन्मान | Honoring those |who work for their lives | as covid warriors
५ ऑक्टोबर | दिन विशेष |October 5 | is a special day|
५ ऑक्टोबर | दिन विशेष |October 5 | is a special day|
१)आशियातील पहिल्या सर्कशीचा मुंबईत पहिला प्रयोग ( १८७८ )(First experiment of the first circus in Asia in Mumbai (1878)
२)भीषण चक्री वादळामुळे कलकत्ता शहर उधवस्त होऊन सुमारे ६०,००० हजार लोक ठार झाले होते.(१८६४).(The city of Calcutta was devastated by a severe cyclone that killed about 60,000 people (1864)
३)पोर्तुगाल मध्ये राजसत्ता संपुष्टात येवून ते प्रजासत्ताक बनले (१९१०)(The monarchy in Portugal came to an end and it became a republic (1910).
४)१९९५ कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कर जेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर.(1995 Janasthan Award given by Kusumagraj Pratishthan to Senior Poet Indira Sant.)
५ ऑक्टोबर | दिन विशेष |October 5 | is a special day|
५)माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर.(Indira Gandhi National Integration Award announced to former President Dr. APJ Abdul Kalam.)
६)१९२२ लेखक,संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म.(1922 Birth of writer, editor Yadunath Thatte.)
७)१९२२ संगीतकार शंकर- जयकिशन या जोडीतील शंकरसिंग रघुवंशी यांचा जन्म.(1922 Musician Shankar-Jaikishan duo Shankarsingh Raghuvanshi was born.)
८)१८३२ भारतीय क्रिकेटपटू माधव आपटे यांचा जन्म. (1832 Birth of Indian cricketer Madhav Apte.)
९)१९६४ भारतीय क्रिकेटपटू सरबिंदू मुखर्जी यांचा जन्म.(1964 Birth of Indian cricketer Sarbindu Mukherjee.)
-----------------------------------------------------------------------
५ ऑक्टोबर | दिन विशेष |October 5 | is a special day|
म्हणी आणि अर्थ
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्न करा - क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे
-----------------------------------------------------------------------
५ ऑक्टोबर | दिन विशेष |October 5 | is a special day|
आजचा सुविचार
जिंकण्याची जिद्द अशी ठेवा कि, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे.
---------------------------------------------------------------------------
५ ऑक्टोबर | दिन विशेष |October 5 | is a special day|
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
0 Comments