अपघाती निधन झालेल्या | मित्राच्या कुटुंबाला | मित्रांनीच दिला आर्थिक आधार | Friends gave financial support to the family of a friend who died in an accident
अपघाती निधन झालेल्या | मित्राच्या कुटुंबाला | मित्रांनीच दिला आर्थिक आधार | Friends gave financial support to the family of a friend who died in an accident
शिराळा: येथील प्लंबिंगचे काम करणारे संजय पोपट शेटे यांचे १५ सप्टेंबर रोजी कामावरून घरी येत असताना अपघाती निधन झाले.त्यांच्या कुटुंबाला शिराळा तालुका कामगार परिषदेच्या माध्यमातून शिराळा परिसरातील प्लंबिंग व्यवसायिक,दुकानदार आणि दानशूर लोकांच्या सहकार्याने आर्थिक मदत देण्यात आली.असंघटीत क्षेत्रात काम करत असलेल्या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शिराळा तालुका कामगार परिषद कार्यरत आहे.
अपघाती निधन झालेल्या | मित्राच्या कुटुंबाला | मित्रांनीच दिला आर्थिक आधार | Friends gave financial support to the family of a friend who died in an accident
पाडळी (ता.शिराळा ) येथे शिरशी - शिराळा मार्गावर झालेल्या अपघातात संजय शेटे यांचा मृत्यू झाला . कुंटुंबाचा ते प्रमुख आधार होते. त्यांच्या मृत्यूनंतर शिराळा तालुका कामगार परिषदेच्या माध्यमातून अध्यक्ष मारूती रोकडे यांनी आधार देण्याचे काम केले आहे.
अपघाती निधन झालेल्या | मित्राच्या कुटुंबाला | मित्रांनीच दिला आर्थिक आधार | Friends gave financial support to the family of a friend who died in an accident
त्यांनी शिराळा परिसरातील प्लंबिंग व्यवसायिक, दुकानदार आणि दानशूर लोकांच्या सहकार्यातून शेटे कुटुंबाला आर्थिक मदत केली.शिराळा ट्रेडर्स असोशियनचे अध्यक्ष विश्वास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मदत देण्यात आली.शाम सेल्स चे मेघश्याम आवटे, गुरुकृपा ट्रेडर्सचे मनोज खंडागळे- पाटील, यशोदीप ट्रेडर्सचे बाबासाहेब पवार, महालक्ष्मी ट्रेडर्सचे भरत पटेल, शेतकरी हार्डवेअरचे मारुती साळुंखे, समर्थ हार्डवेअरचे सुरज यादव , प्लंबिंग व्यावसायिक कृष्णा पवार, सचिन पाटील, शिवाजी कडवेकर, रघुनाथ शिंदे, विश्वास पाटील, सुरेश तेली, केतन पांगे, खंडेराव शिंदे यांनी यासाठी सहकार्य केले.यावेळी कामगार परिषदेचे अध्यक्ष मारूती रोकडे,रमेश हिरवडेकर, बाबा पाटील, गोरख कुंभार, पराग खंडागळे आदी उपस्थित होते.
अपघाती निधन झालेल्या | मित्राच्या कुटुंबाला | मित्रांनीच दिला आर्थिक आधार | Friends gave financial support to the family of a friend who died in an accident
0 Comments