शिराळा : सोनाबाई यशवंतराव नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरामध्ये १८३ रुग्णाची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी ५७ रुग्णांची निवड करणेत आली.
शिराळा स्वर्गीय सोनाबाई यशवंतराव नलावडे, यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजीत करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन आपला बझार उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ.सुनीता नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक , डॉ. सौ.शिमोनी नाईक , नगरसेवक केदार नलवडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी (नेत्र चिकित्सा अधिकारी) सौ.सविता नलवडे,राजीव नलवडे,.संभाजी नलवडे,संजय नलवडे, विजय नलवडे, प्रफुल्ल नलवडे, प्रकाश नलवडे,जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी ग्रुप सदस्य , डॉ.पटवर्धन यांच्या नंदादीप नेत्रालय सांगली येथील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते. या शिबिरास फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष,.अमरसिंह नाईक ,नगरसेवक अभिजीत नाईक यांनी सदिच्छा भेट दिली.
0 Comments