तांदुळवाडी (ता. वाळवा) येथील श्री.क्लिनिक समोर लावलेली हुंन्दाई चारचाकी गाडी चोरी प्रकरणी कुरळप पोलिसांनी कापूसखेड (ता, वाळवा) येथील रोहित बाजीराव आकडे याच्या शिताफिने २४ तासात मुसक्या आवळल्या .
काय घडलं होत वाचा 👉 चोरी...सोशल मीडियावर पोस्ट .. पाठलागाचा थरार.
याबाबत डॉ.अमोल पांडुरंग पाटील (वय 36 ) रा. लाटवडे (ता. हातकणंगले) जि.कोल्हापुर सध्या रा.तांदुळवाडी ता. वाळवा यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दिली होती. यावरून सहाय्य्क पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी करून तांदुळवाडी येथून हुंदाई कंपनीची कार चोरीला गेली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली होती.
यामध्ये गाडी नंबर, रंग याची सर्व माहिती होती. त्यावेळी कुरळप येथील सागर कामेरकर व अक्रम मुलाणी हे युवक कोल्हापूर जिल्ह्यतील अमृतनगर फाट्यावरील पेट्रोल पंपावर उभे होते. त्यांनी गाडी चोरीला गेल्याची पोस्ट वाचली होती. त्याचवेळी त्यांना तांदुळवाडी येथून चोरीला गेलेली गाडी समोर दिसली. त्यांनी तात्काळ सपोनि दीपक जाधव यांना फोन वरून ती गाडी आमच्या समोर उभी असल्याचे सांगितले. त्यावेळी जाधव यांनी त्या गाडीचा पाठलाग करा, आम्ही येतो असे सांगून जाधव यांनी त्या तरुणांना काही होणार नाही याची खरदारीसाठी तात्काळ यंत्रणा सुरु केली. तोपर्यत या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता गाडीचा पाठलाग करण्यास सुरवात केली होती.
0 Comments