जयंतराव पाटील | यांच्यामुळे विरोधकांचे | वाकुर्डेचे तुणतुणे बंद | आमदार मानसिंगराव नाईक | Due to|Jayantrao Patil | the opposition's |Wakurde tuntune | is closed - MLA Mansingrao Naik

जलसंपदामंत्री जयंतराव पाटील (Jayantrao Patil) यांच्या माध्यमातून २०२४ पर्यंत वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केल्याने आता विरोधकांचे वाकुर्डे योजनेचे तुणतुणे वाजणे बंद होईल. या योजनेचे खरे श्रेय जयंतराव पाटील यांचे असल्याने ते कोणी लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोला आमदार मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांनी माजी आमदार शिवाजीराव नाईक( shivajirao naik) यांचे नाव न घेता लावला.
जयंतराव पाटील | यांच्यामुळे विरोधकांचे | वाकुर्डेचे तुणतुणे बंद | आमदार मानसिंगराव नाईक | Due to|Jayantrao Patil | the opposition's |Wakurde tuntune | is closed - MLA Mansingrao Naik
शिराळा येथे नागमनी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले, मी २००९ ला आमदार असताना या योजनेला तत्कालीन मंत्री अजितदादा पवार यांनी १६५ कोटींचा निधी दिला. त्यावेळी अंशतः वाकुर्डे योजना कार्यन्वित झाली. त्यानंतर युती शासनाने पाच वर्षात फक्त ६० कोटींचा तुटपुंजा निधी दिला. १०१९ ला महाविकास आघाडी सरकार आले. जयंतराव पाटील जलसंपदामंत्री झाल्याने त्यांनी वाकुर्डे योजनेची पाहणी केली.अधिकाऱ्यांनी मागणी केल्या प्रमाणे दोन वर्षात वाकुर्डे साठी २०० व वारणा डावा कालव्यासाठी २०० कोटी असा शिराळा तालुक्याला ४०० कोटींचा निधी दिला. त्यामुळे युती शासनाच्या काळात या रेंगाळलेल्या योजनेला गती मिळाली आहे. आता या योजनेला ९०८.४४ कोटींची सुधारित मान्यता मिळाल्याने या योजनेच्या कामांना आणखी गती मिळेल.
जयंतराव पाटील | यांच्यामुळे विरोधकांचे | वाकुर्डेचे तुणतुणे बंद | आमदार मानसिंगराव नाईक | Due to|Jayantrao Patil | the opposition's |Wakurde tuntune | is closed - MLA Mansingrao Naik
शिराळा तालुक्यातील मेणी,शिरशी व इतर प्रस्तावित कामांच्या निविदा डिसेंबर अखेर निघून ती ही कामे सुरू होती. या योजनेला सुधारित मान्यता मिळाल्याने नाबार्डचे अर्थसहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिराळा तालुक्यातील सर्व कामाची टेंडर निघाल्यानंतर वाळवे तालुक्यातील कामांची टेंडर निघतील. नाहीतर शिराळच्या ऐवजी वाळव्याच्या कामांची टेंडर निघणार अशी कोणीतरी अफवा पसरवून लोकांच्यात संभ्रम निर्माण करेल. ही योजना जयंतराव पाटील यांच्यामुळेच पूर्णत्वास जाणार असल्याने या योजनेसाठी त्यांचेच श्रेय आहे.
जयंतराव पाटील | यांच्यामुळे विरोधकांचे | वाकुर्डेचे तुणतुणे बंद | आमदार मानसिंगराव नाईक | Due to|Jayantrao Patil | the opposition's |Wakurde tuntune | is closed - MLA Mansingrao Naik
यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, कार्यकारी अभियंता डी.डी.शिंदे. सहाय्यक अभियंता डी. डी. परळे, शाखा अभियंता व्ही. एम. पाटील, विश्वासचे माजी संचालक भीमराव पाटील उपस्थित होते.

0 Comments