BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कंत्राटी |वायरमन मृत्य प्रकरणी |या महिला वायरमनवर गुन्हा दाखल | Contract | Wireman death case | Filed a case against this woman Wireman |


 वाचा 👉असा झाला नवदुर्गा सन्मान सोहळा 


कंत्राटी |वायरमन मृत्य प्रकरणी |या महिला वायरमनवर गुन्हा दाखल | Contract | Wireman death case | Filed a case against this woman Wireman |


याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १जून २०२० रोजी सागाव येथे घडली होती. याबाबत शिराळा पोलिसातून मिळालेली माहिती अशी सागाव येथील कलाव्या जवळ लाईट बंद पडलेली होती . त्याठिकाणी कर्तव्यावर पाठविलेल्या महिला वायरमन जयश्री उत्तम जाधव यांनी आपल्या सोबत कंत्राटी वायरमन सुमित कृष्णांत पाटील (वय ३७) रा . मांगले व मयत अक्षय रामराव पाटील (वय २४) रा . कांदे यांना घेऊन सागाव भागातील फॉल्टी पोलवर कामकाज करण्यासाठी गेल्या. त्यांनी त्या विभागात ज्या ठिकाणाहून विद्युत प्रवाह चालू आहे त्याची पुर्ण खात्री करणे आणि त्याठिकाणी उपकेंद्र कणदुर येथील विद्युत प्रवाह व त्यास बाहेरुन जोडणारा चिखली उपकेंद्रातून आलेले नाटोली गावठाण हा रिंग फिडींग प्रवाह एक जंम्प सागाव गावठाणच्या आऊट गोइंगच्या ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी जाऊन तेथील विद्युत प्रवाह बंद अगर चालू आहे याची खातरजमा करणे  जयश्री जाधव यांची जबाबदारी होती .
कंत्राटी |वायरमन मृत्य प्रकरणी |या महिला वायरमनवर गुन्हा दाखल | Contract | Wireman death case | Filed a case against this woman Wireman |

परंतु त्यांनी केवळ सागाव येथील विद्युत प्रवाह कनेक्शन बंद केले. चिखली उपकेंद्राच्या ठिकाणच्या कनेक्शनची पडताळणी केली नाही . त्या घटनेच्या आदल्या दिवशी वादळी वारा व पाऊस झालेला होता . अशा परिस्थितीत चिखली उपकेंद्रातील आलेल्या लाईनच्या रिंग फिडींगचा ए . बी . स्विच हा चालू आहे किंवा बंद आहे किंवा त्याठिकाणी निश्चित काय स्थिती आहे , हे पाहिले नाही.त्यांनी आपल्या कर्तव्यात हयगय निष्काळजीपणा केला. घटनास्थळांवरील पोलवर अर्थीग केले नाही.त्यामुळे त्या पोलवरील विदयुत प्रवाह चालूच राहिल्याने त्या ठिकाणी कंत्राटी वायरमन अक्षय रामराव पाटील हा विदयुत पोलवर चढुन काम करीत असताना विजेचा शॉक लागुन त्याचा मृत्यू झाला. त्यास वायरमन जयश्री  जाधव ह्या जबाबदार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करीत आहेत.
कंत्राटी |वायरमन मृत्य प्रकरणी |या महिला वायरमनवर गुन्हा दाखल | Contract | Wireman death case | Filed a case against this woman Wireman |

Post a Comment

0 Comments