BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोली धरण |पर्यटकांसाठी खुले | Chandoli Dam | open to tourists |

चांदोली धरण |पर्यटकांसाठी खुले | Chandoli Dam | open to tourists |


शिराळा तालुक्यातील चांदोली धरण  पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहीती शाखा अभियंता टि.एस.धामणकर यांनी दिली आहे.

चांदोली धरण |पर्यटकांसाठी खुले | Chandoli Dam | open to tourists 

  

चांदोलीचा परिसर हा  बारमाही हिरवळीने नटलेले असल्यामुळे पर्यटकांची पाऊले  नेहमीच  चांदोलीकडे वळल्याशिवाय रहात नाहीत. एक नोव्हेंबरला पर्यटकासांठी सुरु होणारे चांदोली धरण पर्यटकांच्या विनंतीवरुन धरण प्रशासनाने शनिवारी सकाळपासुनच  पर्यटकासांठी खुले केल्याने पर्यटकांच्यातुन समाधानाचे वातावरण पसरले आहे.

शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा  

धरण पाहण्यासाठी पर्यटकांना सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विनामुल्य पास वारणावती येथील शाखा कार्यालयात देण्याची व्यवस्था धरण प्रशासनाने केली आहे. पर्यटकांनी पास काढतेवेळी आधारकार्ड,मतदान कार्ड,ड्रायव्हिंग लायसन  यापैकी कोणता  ही एक पुरावा  दाखवणे गरजेचे आहे.पर्यटकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण पाहता येऊ शकते.

चांदोली धरण |पर्यटकांसाठी खुले | Chandoli Dam | open to tourists 

 

संपुर्ण धरण परीसर सिसिटीव्हीच्या  कक्षेत आहे. धरणावर दुचाकी,चारचाकी वहानांना जाण्यास बंदी घालणेत आली आहे. पर्यटकांना  धरणाच्या मुख्य गेटवर वहाने थांबवुन धरणावर पायी चालत जावे लागणार आहे.धरण प्रत्येक गुरुवारी पर्यटकांच्यासाठी बंद राहणार आहे.पर्यटकांनी धरणावर गेल्यावर धरणाच्या जलाशयात उतरु नये.असे आदेश धरण प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.  धरण परीसरात फोटो काढणे,व्हिडीओ शुटींग करण्यास मनाई आहे.पर्यटकांनी कोरोना नियमांचे पालन करुन धरण पहावे.असे आवाहन शाखा अभियंता टि.एस.धामणकर यांनी केले आहे.

चांदोली धरण |पर्यटकांसाठी खुले | Chandoli Dam | open to tourists 

Post a Comment

0 Comments