शाळेतच जातीचे दाखले मोफत- आमदार मानसिंगराव नाईक | Caste certificates | free at school | MLA Mansingrao Naik
शाळेतच जातीचे दाखले मोफत- आमदार मानसिंगराव नाईक | Caste certificates | free at school | MLA Mansingrao Naik
शिराळा:शिराळा तालुक्यातील १० वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांना शाळेतच जातीचे दाखले मोफत देण्यात येणार असल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
येथील तहसीलदार कार्यालयात दहावी ते बारावी पर्यंतच्या मुलांना शाळेत दाखले देण्यासंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी नाईक म्हणाले,दहावी,अकरावी व बारावीच्या परीक्षा संपल्यावर विविध दाखल्यासाठी पालकांची व मुलांची धावपळ होत असते. अनेकांना वेळेत दाखले न मिळाल्याने त्यांना पुढील प्रवेशाला अडचणी येतात. यासाठी मुलांना लागणाऱ्या शैक्षणिक दाखल्याची सोय उपलब्ध व्हावी म्हणून मोफत दाखले हे अभियान राबवणार आहे. यासाठी येणार खर्च हा लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
शाळेतच जातीचे दाखले मोफत- आमदार मानसिंगराव नाईक | Caste certificates | free at school | MLA Mansingrao Naik
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, या दाखल्या सोबत असणाऱ्या कागद पत्रांचा संच त्या विद्यार्थ्यांना दिला जाईल त्याचा उपयोग त्यांच्या कुटुंबातील इतर मुलांना होईल. या दाखल्यांचे वाटप शाळेत केले जाईल. यासाठी सेतू चालकानी सहकार्य करावे.
गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर म्हणाले, या दाखल्या संदर्भात शिक्षकांची सोमवारी बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या जातील.
शाळेतच जातीचे दाखले मोफत- आमदार मानसिंगराव नाईक | Caste certificates | free at school | MLA Mansingrao Naik
यावेळी युवक राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष विराज नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसिलदार अशोक कोकाटे,गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर,केंद्र प्रमुख विष्णू दळवी, सेतू चालक उपस्थित होते.
शाळेतच जातीचे दाखले मोफत- आमदार मानसिंगराव नाईक | Caste certificates | free at school | MLA Mansingrao Naik
0 Comments