BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गाडीची चोरी...सोशल मीडियावर पोस्ट ... पाठलागाचा थरार....Car theft ... Post on social media ... The thrill of the chase ....

तांदुळवाडी  (ता. वाळवा) येथील श्री.क्लिनिक समोर  लावलेली  हुंन्दाई चारचाकी गाडी ( MH 09 FJ1027)  रविवारी  सकाळी 07.15 ते 7.40 च्या  दरम्यानसात  अज्ञाताने  चोरून नेलेची.  

याबाबत डॉ.अमोल पांडुरंग पाटील (वय 36 ) रा. लाटवडे (ता. हातकणंगले)  जि.कोल्हापुर सध्या रा.तांदुळवाडी ता. वाळवा यांनी कुरळप पोलिसात सकाळी नऊ वाजता फिर्याद दिली होती. यावरून सहाय्य्क पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली. सकाळी अकरा वाजता तांदुळवाडी येथून हुंदाई कंपनीची कार चोरीला गेली  असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली.

गाडीची चोरी...सोशल मीडियावर पोस्ट  ... पाठलागाचा थरार....Car theft ... Post on social media ... The thrill of the chase ....

 यामध्ये गाडी  नंबर, रंग याची  सर्व माहिती होती. दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास  कुरळप येथील सागर कामेरकर व अक्रम मुलाणी हे युवक कोल्हापूर जिल्ह्यतील अमृतनगर फाट्यावरील पेट्रोल पंपावर उभे  होते. त्यांनी  गाडी चोरीला गेल्याची  पोस्ट  वाचली होती. त्याचवेळी त्यांना  तांदुळवाडी येथून चोरीला गेलेली गाडी समोर दिसली. त्यांनी  तात्काळ सपोनि दीपक जाधव यांना फोन वरून ती  गाडी आमच्या समोर उभी असल्याचे सांगितले.  त्यावेळी  जाधव यांनी  त्या गाडीचा पाठलाग करा, आम्ही येतो असे सांगून जाधव यांनी  त्या तरुणांना काही होणार नाही याची खरदारीसाठी तात्काळ यंत्रणा सुरु केली. तोपर्यत या दोन तरुणांनी जीवाची पर्वा न करता गाडीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. 
गाडीची चोरी...सोशल मीडियावर पोस्ट  ... पाठलागाचा थरार....Car theft ... Post on social media ... The thrill of the chase ....

आपला पाठलाग केला जातोय असे चोरट्याच्या लक्षात आल्याने त्याने भरधाव गाडी चालवत अंबप फाट्यावरून कच्या रस्त्याने धूम टोकण्याचा  प्रयत्न केला.या मध्ये चोरट्याने रस्त्यावरील  मोटारसायकला धडक ही दिली. मात्र या तरुणांनी त्याचा पाठलाग सोडला नाही.  त्यामुळे चोरटे  घाबरले . त्यांनी  कोल्हापूर  जिल्ह्यतील वाठार जवळील एका  हॉटेल जवळ गाडी सोडून पळ काढला. तो पर्यत पेठ वडगावपोलीस स्टेशनचे अधिकारी व कुरळप पोलीस स्टेशनचे सपोनि दीपक जाधव हे आपल्या कर्मचाऱ्या सोबत  गाडीजवळ  पोहचले. गाडी ताब्यात घेतली. मात्र कुरळप येथील तरुणांनी दाखवलेल्या धाडसमुळे अवघ्या नऊ तासात चोरीची गाडी ताब्यात मिळाल्याने सर्व स्थरातून या दोन तरुणांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. चिकुर्डे येथील सामाजिक कार्यकर्ते शाहजी राजे भोसले हे सुद्धा आपल्या पारगाव येथील मित्रांबरोबर गाडीचा पाठलाग करत वाठार पर्यत पोहचले. आणि चोरीच्या थरार नाट्याला पूर्णविराम  मिळाला.
गाडीची चोरी...सोशल मीडियावर पोस्ट  ... पाठलागाचा थरार....Car theft ... Post on social media ... The thrill of the chase ....

Post a Comment

0 Comments