BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे मटण घ्या. |Book and buy a kilo of house goat meat for Rs.500.

  बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे  मटण घ्या. |Book and buy a kilo of house goat meat for Rs.500.

व्यवसाय करायचा म्हटलं की त्यात स्पर्धा आलीच पण या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अनेक शक्कल लढवाव्या लागतात अशीच नामी शक्कल  शिराळा तालुक्यातील नाटोली गावातील संभाजी जानकर व संदीप कांबळे  यांनी लढवली आहे.  बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे  मटण घेऊन जावा अशी नवीन योजना सुरू केली आहे. व्यापाऱ्यां पेक्षा स्वतःला व्यवसाय व शेतकऱ्यांचा फायदा करणाऱ्या या योजनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

 बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे  मटण घ्या. |Book and buy a kilo of house goat meat for Rs.500.

         शेतकरी आपल्या रक्ताचं पाणी करुन शेळीपालन करतो.  परंतु व्यापारी त्या बकऱ्यांची किंमत कवडी मोलाने करून स्वतः भरमसाठ नफा मिळवतात.  आपण राबून काय फायदा असे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे. अशा शेतकऱ्यांना या नवीन योजनेचा फायदा होत आहे.

किती ही महागाई वाढली तरी मांसाहार कोणी बंद केलेला नाही.मटणाचे दर गगनाला भिडले तरी त्याची मागणी कमी झालेली नाही. सध्या ६०० रुपये  किलो असा मटणाचा दर आहे. तेही निवडक मटण मिळत नाही.त्यामध्ये चरबी,आतडे, कोथळा यांचे प्रमाण जास्त असते. हीच मटण विक्रेत्याकडून होणारी लूट लक्षात आल्याने अनेक गावातील  लोक सण व उत्सवाच्या वेळी एकत्रित येऊन बोकड कापतात. त्यामुळे चांगले मटण व कमी पैसे ज्याचे बकरे विकत घेतले त्याला व्यापाऱ्यांच्या पेक्षा दुप्पट दर असा तिहेरी फायदा होत असतो.

 बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे  मटण घ्या. |Book and buy a kilo of house goat meat for Rs.500.

याच संकल्पनेला नाटोली येथील संभाजी जानकर व संदीप कांबळे या दोन युवकांनी व्यावसायिक स्वरूप देण्याचे ठरवले आहे.  शेतकऱ्याची बकरी घेऊन कापण्यासाठी घेऊन त्यातील ठराविक आपला व खाटीक याचा हिस्सा बाजूला ठेवून उर्वरित सर्व रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांपेक्षा चार हजार रुपये जास्त मिळतात.

त्यामुळे शेतकरी या ठिकाणी येऊन आपल्या बकऱ्यांची सहज विक्री करून  पैसे मिळवू लागले आहेत. शिवाय ग्राहकांना १०० रुपये स्वस्त मटण मिळत असल्याने अनेकजण बुकिंगवर भर देत आहेत.

 बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे  मटण घ्या. |Book and buy a kilo of house goat meat for Rs.500.

माझा शेळी पालन व्यवसाय आहे.पण मेहनती प्रमाणे व्यापारी वर्गाकडून मोबदला मिळत नाही.यामुळे शेळी पालन तोट्यात जाऊ लागले.म्हणून मी गेले वर्षभर गावातील लोकांना एकत्रित करून बकरे कापून मटण विक्री सुरू केली.त्यातून मला चांगले पैसे मिळू लागले.त्यामुळे आम्ही इतर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने विक्री सुरू केली तर शेळी पालन व्यवसाय फायदेशीर ठरतो हे पटवून दिले.त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा व्यवसाय गावासाठी मर्यादित न रहाता याची व्याप्ती वाढावी म्हणून आम्ही बुकिंग सुरू केले आहे.त्यानुसार नियोजन करून मटण विक्री करणार आहे. याची सुरुवात २६ ऑक्टोबर पासून होत आहे. या बुकिंगसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संभाजी जानकर( शेळी पालक-नाटोली)

 बुकिंग करा आणि ५०० रुपयाला एक किलो घरच्या बकऱ्याचे  मटण घ्या. |Book and buy a kilo of house goat meat for Rs.500.

Post a Comment

0 Comments