BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाकुर्डे योजनेला ९०८.४४ कोटींची सुधारित मान्यता- आमदार मानसिंगराव नाईक| 908.44 crore revised approval for Wakurde scheme - MLA Mansingrao Naik

वाकुर्डे योजनेला |९०८.४४ कोटींची |सुधारित मान्यता- आमदार मानसिंगराव नाईक| 908.44 crore | revised approval |for Wakurde scheme |  MLA Mansingrao Naik | 




वाकुर्डे योजनेला |९०८.४४ कोटींची |सुधारित मान्यता- आमदार मानसिंगराव नाईक908.44 crore | revised approval |for Wakurde scheme |  MLA Mansingrao Naik | 

 

शिराळा: जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेला ९ ०८.४४ कोटी किंमतीच्या द्वितिय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

त्यामुळे या योजनेअंतर्गत असणारे सर्व क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होईल अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी नाईक म्हणाले, जयंतराव पाटील जलसंपदामंत्री झाले,त्यावेळी  त्यांनी या योजनेसाठी भरीव तरतूद करण्याची घोषणा केली होती.त्यानुसार त्यांनी या योजनेसाठी गेले दोन वर्षात चांगला निधी दिला आहे. या ही अर्थसंकल्पात चांगला निधी उपलब्ध होईल. वाकुर्डे योजनेच्या भाग दोनचा विस्तार हा पोखर्णी पर्यत होणार आहे. त्यामुळे शिराळा व वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची तहान भागेल.या परिसरातील क्षेत्र ओलिताखाली येऊन आर्थिक सुबत्ता येईल.

वाकुर्डे योजनेला |९०८.४४ कोटींची |सुधारित मान्यता- आमदार मानसिंगराव नाईक908.44 crore | revised approval |for Wakurde scheme |  MLA Mansingrao Naik | 

 

या योजनेच्या दुसऱ्या सुधारित प्रस्तावास ९ ०८.४४ कोटीची मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेला आत आणखी गती मिळून ही योजना लवकरच पूर्णत्वास येईल. 

९ ०८.४४ कोटी किंमतीचा द्वितीय सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी  १२ जुलै २०२१ रोजी  सादर करण्यात आला होता. सांगली या वाकुर्डे योजनेमुळे  शिराळा तालुक्यातील ७२७०,वाळवा तालुक्यातील १८५६५ व कराड तालुक्यातील २२०० हेक्टर अशा सिंचनापासुन वंचित क्षेत्रासाठी ११० गावांतील २८०३५ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे .या प्रकल्पासाठी द्वितीय सुधारीत प्रशासकीय प्रस्ताव  २७ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.हा निर्णय शेतकरी हिताचा आहे.

यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे, विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम उपस्थित होते.

वाकुर्डे योजनेला |९०८.४४ कोटींची |सुधारित मान्यता- आमदार मानसिंगराव नाईक908.44 crore | revised approval |for Wakurde scheme |  MLA Mansingrao Naik | 


Post a Comment

0 Comments