तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
कोल्हापूर : कापशी , ता.शाहुवाडी येथील आरवचा खून हा तो आपला मुलगा नसल्याचा मनात संशय ठेवून हाताच्या ठोशाने छातीवर मारून त्यात बेशुध्द पडल्या नंतर त्याचा गळा आवळून वडील राकेशने केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
कापशी , ता.शाहुवाडी येथील आपल्याच मुलाचा खुन करून प्रथम अपहरण व त्यानंतर नरबळीचा बहाणा करणाऱ्या बापास पोलिसांनी जेरबंद करून ४८ तासात गुन्हा उघडकीस आणला. याबाबत मिळालेली महिती अशी,दिनांक ०३.१०.२०२१ रोजी कापशी,ता.शाहुवाडी येथील कु .आरव राकेश केसरे , (वय ५ वर्षे ७ महीने) या मुलाचे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राहते परीसरातून अपहरण झालेबाबत आरवचे वडील राकेश रंगराव केसरे यांनी रात्री उशिरा शाहुवाडी पोलीस ठाणे येथे मुलगा हारवले बाबत तक्रार दिली . त्याबाबत बालकाचे अपहरणाचा गुन्हा नोंद झाला .
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
तपास पथके कापशीत दाखल
सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर लहान मुलाचे अपहरण होणे ही बाब गंभीर स्वरुपाची असलेने दिनांक ०४ १० , २०२१ रोजी सकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहीया, पोलीस अधीक्षक, शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचेसह सर्व तपास पथके कापशी येथे दाखल झाली. . कु . आरव केसरे हा राहत असलेले घर व परीसराची पाहणी करून तपासात मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. लहान बाळाचे अपहरण झालेचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरीष्ठांनी तपासाबाबत सुचना दिल्या .
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
आठ तपास पथके लागली तपासाला
त्याप्रमाणे वेगवेगळी आठ तपास पथके स्थापन करून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेणेचे काम चालू केले . तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी नमुद गांवातच तळ ठोकून सातत्याने अपहरण झालेले बालक कु.आरव हा अल्पवयीन मुलगा हारवलेची तक्रार लक्षात घेता व त्याचे हरविण्याची
जागा मध्यवस्तीत असल्याने आजुबाजूचा परिसर पिंजून काढला . त्यात प्रामुख्याने आडगळ
ठिकाणे, विहिरीतील पाण्यामध्ये गळ टाकून मुलाचा शोध घेतला, श्वानपथक तसेच सी.सी.टि.व्ही.
पहाणारे तपास पथकाने गावात येणारे जाणारे व्यक्ती व वाहनांची पडताळणी केली . स्थानिक
पोलीसांनी तपासकामात कागदोपत्री पुर्तता करीत असताना सर्व तपासपथके गावातील लोकांच्याकडे
विशेषतः महिलांकडे चौकशी करीत होते .
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
गुलाल,कुंकू टाकलेल्या अवस्थेत आरवचे प्रेत सापडले
दि .०५.१०,२०२१ रोजी पहाटेच्या सुमारास आरव याचे प्रेत गुलाल,कुंकू टाकलेल्या अवस्थेत त्याचे घरासमोर सुमारे २० फुट अंतरावर त्याचेच पडक्या घराच्या बाजूला मिळून आले. त्यावेळी गावात तणावाचे व असंतोषाचे वातावरण होवू नये म्हणून शाहुवाडी विभागातून मोठ्या प्रमाणात कापशी गावात बंदोबस्त लावण्यात आला होता . कु.आरव याचे प्रेत मिळाले नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहीया, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी पुन्हा तपास पथकांना तपासाबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या . त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी
गावातील नागरिक व महिला यांचेकडे बारकाईने चौकशी करून सायबर क्राईमद्वारे बारकाईने
तांत्रिकदृष्ट्या तपास केला.
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
घरातील नातेवाईक यांच्यावर संशय
त्यावेळी अपहरीत बालकाचे घरातील नातेवाईकांबाबत संशय निर्माण झालेने दि .०६.१०.२०२१ रोजी सर्वांना बोलावून तपास केला. त्यावेळी आरवचे वडील राकेश केसरे
याच्या पत्नीचे अनैतिक संबंध आहेत. कु.आरव हा आपला मुलगा नसून तो परपुरूषापासून
झालेला आहे याचाच मनात संशय ठेवून पत्नीशी वारंवार वाद होत असल्याचे प्राथमिक तपासात
पुढे आले.
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
आई ब्यूटी पार्लर मध्ये ,घरात बापाने घोटला मुलाचा गळा
मुलाचे वडील राकेशकडे सखोल तपास केला असता दि . ०३.१०.२०२१ रोजी राकेश
याचा नातेवाईक दुपारच्या जेवणाकरीता घरी येवून गेला. याचा राग डोक्यात असतानाच कु .
आरव हा घरात आला. त्यावेळी त्याची पत्नी घरासमोरील ब्यूटी पार्लर मध्ये गेली होती. तेव्हा
आरव व राकेश हे दोघेच घरी असताना राकेश यांच्या मनात असलेल्या द्वेषाने राकेश याने आरव
यास हाताचे ठोशाने छातीवर जोरात मारलेने.त्यातआरव बेशुध्द पडला . त्यानंतर त्याचा गळा
दाबून ठार केले.
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
कडब्याच्या पेंड्याखाली झाकले प्रेत
पत्नी घरी येण्या अगोदरच आपले घराचे पाठीमागे असले अडगळीचे खोलीत ठेवून त्यावर कडब्याच्या पेंड्या झाकून प्रेत लपवून ठेवले.आरव हा हरवलेचा बहाणा करून मुलाचा शोध घेवून तो मिळून येत नाही असे दाखवून रात्री उशिरा शाहुवाडी पोलीस ठाणेस तक्रार दिलेचे निष्पन्न झाले . लहान मुलाची तक्रार गंभीरतेने घेवून पोलीस प्रशासनाने गावात तळ ठोकून तपास चालू ठेवला . त्यावेळी राकेश केसरे याने पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणेच्या हेतुने तपासात सहभागी झाला. त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू असताना राकेश केसरे याने गावातील दुकानातून नारळ,गुलाल,कुंकू व लिंबू असे साहित्य खरेदी करून खरेदी केलेल्या साहित्यापैकी एक नारळ गावातील महादेव मंदीरासमोर ठेवून स्वतः शोध करीत असलेचा बहाणा केला.
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
अन त्याने खुनाची कबुली दिली.
या सर्व घटनेचा तपास यंत्रणेने अभ्यास करून तपास चालू असताना तपास
पथकातील उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे, प्रमोद
जाधव, विजय पाटील, सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले, श्रीमती श्रध्दा आमले, पोलीस
उपनिरीक्षक प्रसाद कोळपे व पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे , नितीन चोथे , सचिन गुरखे ,
वसंत पिंगळे,कृष्णात पिंगळे, सोमराज पाटील , सचिन देसाई , श्रीकांत मामलेकर , आत्माराम शिंदे , शिवाजी जामदार , राजेंद्र वरंडेकर यांनी राकेश केसरे याचेकडे सातत्याने व कौशल्यपुर्ण चौकशी करून त्याने केलेल्या कृत्याचा उलघडा केला . अल्पवयीन बालकाचा नरबळी अशी अफवा
पसरलेने निर्माण झालेला जनतेतील असंतोष यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणेची
शक्यता असताना पोलीस प्रशासनाने केलेल्या आव्हानानुसार कापशी गावातील नागरीक व पत्रकार
यांनी घेतलेली संयमी भुमिका यामुळे पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्थेमध्ये व्यस्त न रहाता
त्यांनी तपासकामात सर्वतोपरी तपास करता आला . त्यामुळे कु . आरव केसरे या बालकास
मारून नरबळीचा बहाणा करणारे त्याचे बापास जेरबंद करून सदरचा गुन्हा ४८ तासाचे आत
उघडकीस आणणेस सहकार्य लाभले.
तो माझा मुलगा | नसल्याच्या संशयानेच केला | आरवचा खून He killed Arav |on suspicion that | he was not | my son |
शिव सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी प्रत्येक हेडिंगवर क्लिक करा
0 Comments