एकाच सापाच्या दंशाने घेतला भाव बहिणीचा जीव | brother and sister |death |was taken by the bite |of the same |snake
तो लपून घरात बसलेला साप ठरला भावा बहिणीचा कर्दनकाळ भावा पाठोपाठ बहिणीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावच शोकसागरात बुडाले आहे. ही घटना खानापूर तालुक्यातील आळसंदमध्ये घडली आहे .
एकाच सापाच्या दंशाने घेतला भाव बहिणीचा जीव | brother and sister |death |was taken by the bite |of the same |snake
याबाबत समजलेली माहिती अशी, सुनिल कदम हे शेतकरी असून टेलरिंगचा व्यवसाय करत होते . त्यांना विराज हा एकुलता एक मुलगा व दोन मुली आहेत. ६ ऑक्टोबर रोजी विराज ( वय १६ ) यास मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने दंश केला.त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा अंत झाला . मुलाच्या मृत्यूने कदम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळला. विराजच्या रक्षाविसर्जनसाठी त्याची बहीण सायली जाधव ( वय २२ ) ही माहेरी आली होती .
एकाच सापाच्या दंशाने घेतला भाव बहिणीचा जीव | brother and sister |death |was taken by the bite |of the same |snake
गुरुवारी रात्री सर्वजण झोपले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायलीलाही दंश केला .तीला विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले . नंतर पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते .परंतु आठ दिवसांपासून उपचार घेणाऱ्या सायलीची प्रकृती खालावली उपचारा दरम्यान तिचा ही अंत झाला. अशी ही कदम कुटुंबातील भावा बहिणीची दुर्दैवी घटना सर्वांच्या मानला चटका लावणारी आहे.
चिमुकली कायमचीच ताटातूटसायलीला एक वर्षाची मुलगी आहे . सर्पदंश झाल्यापासून ती आईपासून वेगळी आहे . आईला भेटण्यासाठी ती आतूर होती.मात्र नियतीला त्यांची भेट मान्य नसल्याने त्यांची कायमचीच ताटातूट झाली.
एकाच सापाच्या दंशाने घेतला भाव बहिणीचा मृत्य | brother and sister |death |was taken by the bite |of the same |snake
0 Comments