......तर शेतकरी | पेटून उठेल | So the farmers | got up | on fire
......तर शेतकरी | पेटून उठेल | So the farmers | got up | on fire
......तर शेतकरी | पेटून उठेल | So the farmers | got up | on fire
शिराळा : केंद्रातील भाजप सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यावर होणारा अन्याय या पुढे सहन केला जाणार नाही. या सरकारची ही शेतकरी अन्यायाची भूमिका अशीच राहिली तर सर्व देशातील शेतकरी पेटून उठल्याशिवाय रहाणार नाही असे प्रतिपादन सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
शिराळा येथे महाविकास आघडीच्यावतीने तहसीदार कार्यालय समोर आयोजित केलेल्या केंद्रातील भाजपा सरकारच्या निषेध आंदोलन प्रसंगी बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चार शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचा केलेला प्रकार केला व केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने शेतकरी आंदोलने दपडपण्यात येत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेने मार्फत येथील तहसील कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला.
......तर शेतकरी | पेटून उठेल | So the farmers | got up | on fire
तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्च युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज नाईक , तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. रवी पाटील, शिवसेनेचे तालुका संघटक ॲड. सागर घोलप यांनी केले.
यावेळी विजयराव नलवडे, ॲड. रवी पाटील,पंचायत समितीचे उपसभापती बी. के. नायकवडी, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साधना पाटील, शहरप्रमुख निलेश आवटे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने, नगराध्यक्ष सुनीता निकम, राहूल पवार, तालुका उपाध्यक्ष काँग्रेस पोपट कदम, प्रताप यादव, अजय जाधव यांची भाषणे झाली. यावेळी सुतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय दळवी, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय नायकवडी, शिवसेना तालुका संघटक तुकाराम चव्हाण, माजी जी. प. सदस्य प्रवीण शेटे , महादेव कदम, विश्वास कदम,प्रतीभा पवार, किर्तीकुमार पाटील, सुनील कवठेकर, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, राजू निकम, यशवंत निकम, राजसिंग पाटील उपस्थित होते.
......तर शेतकरी | पेटून उठेल | So the farmers | got up | on fire
0 Comments