BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोटारसायकल वरून पडून| मांगलेच्या शिवाजी सावंत | यांचा मृत्यू|Shivaji Sawant |of Mangle died |after falling from a motorcycle|


मोटारसायकल वरून पडून| मांगलेच्या शिवाजी सावंत | यांचा मृत्यू
|Shivaji Sawant |of Mangle died |after falling from a motorcycle|

 
 

शिराळा: मांगले  (ता. शिराळा ) मांगले -काखे रस्त्यावर मोटारसायकल वरून पडून शिवाजी बबन सावंत ( वय ५० , रा.नीलकंठ वसाहत मांगले) यांचा मृत्यू झाला.

याबाबत संताजी सावंत यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली .ही घटना  आज  (ता .२४) रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास  घडली.  याबाबत समजलेली  माहिती अशी की , शिवाजी सावंत हे आपली मोटारसायकल ( क्रमांक एम एच १० बी व्ही २८६८) यावरून जात असता काखे रस्त्यावर मोटारसायकल वरून पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना मांगले प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेत असता त्यांचा मृत्यू झाला. पुढील  तपास हवालदार संदीप भानुसे हे करीत आहेत.

मोटारसायकल वरून पडून| मांगलेच्या शिवाजी सावंत | यांचा मृत्यू

|Shivaji Sawant |of Mangle died |after falling from a motorcycle|

------------------------------------------------------------------------

शिव सामान्यज्ञान स्पर्धा |  भाग 1 |मधील सर्व सहभागी  स्पर्धकांना   प्रमाणपत्र  देत आहोत 

                     
        तुमच्या नावाच्या प्रमाणपत्राला प्रेस करून डाऊनलोड करा.



शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्यासाठी


अशी असेल ही शिव सामान्यज्ञान स्पर्धा

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

 भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या  मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे. 

3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.

4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना  स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल. 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.


Post a Comment

0 Comments