फोटोवर क्लिक करून पहा काय आहे
आरोग्य विभागाच्या | गट क आणि ड संवर्गातील |लेखी परीक्षा | पुढे ढकलल्या Written examinations | in Group C and D of |Health Department postponed|
मुंबई, दि. २४ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड संवर्गातील लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज दिली. अर्ज भरलेल्या प्रत्येक उमेदवाराला परिक्षेसाठी बसण्याची संधी नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार मिळाली पाहिजे म्हणून सर्व उमेदवारांच्या हिताचा विचार करुन लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ही परीक्षा आज शनिवारी आणि उद्या रविवारी आयोजित केली होती.
डॉ. पाटील यांनी सांगितले की ही परीक्षा घेण्यासाठी न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करण्यात आला होता. या कंपनीची निवड राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागा (माहिती तंत्रज्ञान) यांच्या एकवीस जानेवारी २०२१ रोजी ओएमआर व्हेंडौर पॅनेलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनेलमधील सर्व कंपन्यांच्या सक्षमता तपासणी साठी सर्वंकष चाचणी विभागाच्या वतीने घेण्यात आली होती. शासन नियुक्त पॅनेलमधील चाचणीत प्रथम आलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध केले होते. करारातील अटीनुसार आरोग्य विभागाने प्रश्न पत्रिका संच गोपनीय रित्या कंपनीस हस्तांतरण करणे एवढीच जबाबदारी विभागाची होती. भरती प्रक्रियेसाठी संकेतस्थळ विकसित करणे, ऑनलाईन अर्ज मागवणे, उमेदवारांना प्रवेशपत्र देणे, शाळा महाविद्यालये अधिग्रहित करुन बैठक व्यवस्था करणे, लेखी परीक्षा घेणे, गुणवत्ता यादी तयार करणे ही सर्व कामे कंपनीची होती. मात्र आरोग्य विभागाने सर्व सहकार्य करुन देखील न्यासा कम्युनिकेशन कंपनी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आणि बैठक व्यवस्था करण्यात अपयशी ठरली आहे. परीक्षेची पूर्व तयारी पूर्ण न झाल्याने कंपनीच्या संचालकांनी आज सायंकाळी सात वाजता परीक्षा घेण्यासाठी असमर्थता दर्शवली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र मिळाली याची खात्री करुनच परीक्षेचे आयोजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे उमेदवारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ही परीक्षा सर्व तांत्रिक बाबींची पूर्व तयारी करुन लवकरच घेण्यात येईल. परीक्षेची नियोजित तारीख सर्व उमेदवारांना विभागाचे संकेतस्थळ, ई-मेल, एसएमएस व्दारे कळविण्यात येईल, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
खालील फोटोवर क्लिक करून पहा
शिव सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी
अशी असेल ही शिव सामान्यज्ञान स्पर्धा
अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.
प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
नियम व अटी-
1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.
2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे.
3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.
4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल.
4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.
0 Comments