नेर्ले: महाराष्ट्राचं कुलदैवत स्वराज्य संस्थापक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा साक्ष देणारा तब्बल ४४ फुटांचा भगवा ध्वज स्तंभ नेर्ले ता वाळवा जि सांगली येथे "छत्रपती चौकात" बसवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा ध्वज उभा करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच व ऐतिहासिक माहिती करून देणारा ४४ फुटांचा भगवा ध्वज स्तंभ The tallest and most historic 44 feet saffron flagpole in western Maharashtra
अठरा पगड, जातीना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील घटना, प्रसंग व ऐतिहासिक माहिती या ध्वज स्तंभातून उलघडेल अशी भावना ध्वज उभा करतांना आयोजकांनी व्यक्त केली आहे.शिवराज्य प्रतिष्ठान नेर्ले व ग्रामस्थ यांच्या सहभागातून हा इतिहासाची आठवण करून देणारा ऐतिहासिक भगवा ध्वज उभारण्यात आला आहे.स्वराज्यातील मराठ्यांच्या शौर्याच्या गाथेचा साक्षीदार हा ध्वज दिमाखात फडफडताना दिसतो आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच व ऐतिहासिक माहिती करून देणारा ४४ फुटांचा भगवा ध्वज स्तंभ The tallest and most historic 44 feet saffron flagpole in western Maharashtra
ध्वज स्तंभाची रचना अशी ठेवली आहे की एकूण ४४फुटांचा हा ध्वज स्तंभ आहे.याच्या टोकावरती शरभ या प्राण्याची प्रतिकृती बसवण्यात येणार आहे.स्वराज्यावर चाल करणाऱ्या पाच शाह्यांना झुलवत ठेवण्याचे काम राजांनी केलं म्हणून हा शरभ वर बसवण्यात येणार आहे.खालून १२,५,१८,९ आशा अंतरावर पाईप बसवल्या आहेत कारण १२ व्या वर्षी राजांनी राजमुद्रा तयार केली.१७ व्या वर्षी राजांनी पहिला किल्ला जिंकला.१८ फुटांवर मिर्झा राजे यांचेशी तह केला.त्यानंतर ४४व्या वर्षी शिवराज्याभिषेक केला.तसेच अठरा पगड जाती लढल्या म्हणून १८पायऱ्या आहेत.अष्ट प्रधान मंडळ,व शिवाजी महाराज यांच्या ८ पत्नी याची आठवण , अष्टकोनी व बेल्लोर खानाला मारायला जाणारे प्रतापराव गुर्जर व सहा मावळे यांची आठवण म्हणून ७ फूट उंचीचा बुरूज बांधण्यात येणार आहे.अशा अनेक ऐतिहासिक घटनांना एकत्रित करण्याचे काम या युवकांनी केले आहे.शिवराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष संदीप पाटील ,उपाध्यक्ष हर्षवर्धन पाटील, खजिनदार सुरज पाटील, सचिव सुरज विरकर सदस्य -प्रकाश पाटील, अमित पाटील, अमोल औताडे, संतोष पाटील ,सुधीर नाईक, प्रशांत पाटील ,स्वप्नील पाटील, क्षितिज पाटील,किरण नायकवडी, सुहास पाटील, प्रणव पाटील, प्रदीप नाईक, ओमकार पाटील यांनी संयोजन केले.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच व ऐतिहासिक माहिती करून देणारा ४४ फुटांचा भगवा ध्वज स्तंभ The tallest and most historic 44 feet saffron flagpole in western Maharashtra
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच व ऐतिहासिक माहिती करून देणारा ४४ फुटांचा भगवा ध्वज स्तंभ The tallest and most historic 44 feet saffron flagpole in western Maharashtraफोटोवर क्लिक करून पहा काय जादू आहे
शिव सामान्यज्ञान स्पर्धा | भाग 1 |मधील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देत आहोत
शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्यासाठी
अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.
प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
नियम व अटी-
1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.
2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे.
3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.
4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल.
4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.
0 Comments