BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नगरपंचायतीने राबवलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन अभियान कौतुकीस्पद-रणधीर नाईक


 

शिराळा   कोरोणाच्या महामारीमुळे गणेशोत्सव साजरा करणेसाठी  निर्बंध आले असताना नगरपंचायतीने राबवलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन अभियान उपक्रमाला शिराळा शहरातील  नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून नगरसेवक सौ सीमा कदम व उत्तम  (बंडा) डांगे यांनी गणेश भक्तांना कृत्रिम तळ्यामध्ये गणेश विसर्जनाचे महत्व वाढवण्याच्या दृष्टीने लकी ड्रॉ काढून एक चांगला उपक्रम राबवला असल्याचे प्रतिसाद प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले.   

             शिराळा येथील गणपती चौक (तळीचा कोपरा) येथे पर्यावरण रक्षक गणेश विसर्जन लकी ड्रॉचे बक्षीस वितरण करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी  विश्वास कारखान्याचे संचालक रणजीतसिंह नाईक  होते.     

                      यावेळी नाईक  म्हणाले  पर्यावरणाचे महत्त्व सर्वांनी जाणून घेणे काळाची गरज आहे. हवामानामध्ये सातत्याने बदल होत असलेने त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.मध्यंतरी दोन दिवस मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसाने ओढे, नाले, नद्यांना मोठया प्रमाणात पूर आले व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले  असे अनेक प्रकार सध्या घडत असल्याने मानवास एक प्रकारची निसर्गाकडून शिक्षा मिळत मिळत आहे. यापूर्वी गणेश विसर्जन नद्यांना, ओड्यांना व तलावांना केले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते.  कोरोनासारख्या आजारापासून सुरक्षितता  मिळावी या हेतूने  नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी योगेश पाटील यांनी त्यांच्या संकल्पनेतून  पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाचे शहरामध्ये  नियोजन केले व नगरसेवकांनी ही त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करून निरनिराळे उपक्रम राबविले व विवीध  प्रयोग करून नागरिकांचा उत्साह वाढवण्यासाठी काम केल्यामुळे आज हा अभिनव प्रकल्प यशस्वी होऊ शकला.

      यावेळी पर्यावरण रक्षक गणेश विसर्जन लकी ड्रॉ चे बक्षीस वितरण रणधीर नाईक यांनी केले. 


गणेश चौक (तळीचा कोपर येथील विजेते)  -:

   प्रथम क्रमांक-: अनुष्का कदम

व्दितीय क्रमांक-: सायली निकम

तृतीय क्रमांक-: नील गायकवाड

चतुर्थ क्रमांक-अथर्व चरणकर

पाचवा क्रमांक-: संदीप राशिवडेकर 

  घुमट वस्ती (वार्ड क्र१)शिराळा  ड्रॉ मधील विजेते 

प्रथम क्रमांक- संजय सदाशिव गायकवाड, 

व्दितीय क्रमांक-: रणवीर अशोक पाटील ,

तृतीय क्रमांक- उत्‍तम मारुती शिंदे 

चतुर्थ क्रमांक अनिकेत श्रीरंग गायकवाड, 

पाचवा क्रमांक-: संजय यशवंत कदम ,

सहावा क्रमांक आबासाहेब डुबले,

 सातवा क्रमांक- सिद्धेश संजय दुबुले

   यावेळी हरिभाऊ कवठेकर, प्रदीप कदम सौ नंदाताई कदम, सौ तनुजा शिंदे, बबलू शेळके, महादेव गायकवाड, शिवाजी शिंदे,विलास शिंदे, सौ नीता शिंदे,श्रीकांत कदम , मानसिंग कदम, अशोक कदम, कृष्णात कदम,रोहित कदम नगरपंचायत अधीक्षक  सुविधा पाटील,  प्रीती पाटील, काजल शिंदे,रत्ना सुतार, अर्चना गायकवाड ,संभाजी नलवडे ,श्रीरंग गायकवाड, टी.एम. गायकवाड,सुरेश नलवडे, बाबासाहेब डांगे, रवींद्र गायकवाड, दादा फुके, माणिक कदम, शिवाजी इंगवले,अरुण जाधव,दर्शन डांगे आदी मान्यवर उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments