शिराळा शहरात विविध ठिकाणी पर्यावरणाची हाणी टाळण्यासाठी गौरी-गणपती मूर्ती व निर्माल्य विसर्जन करीता कृत्रिम तलाव/कुंडांची नगरपंचायत शिराळा मार्फत व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यापैकी गणपती चौक ( तळीचा कोपरा) येथे घरगुती गौरी-गणपती मूर्ती व निर्माल्य विसर्जन कृत्रिम तलाव/ कुंडांमध्ये विसर्जन करुन पर्यावरणास हातभार लावणाऱ्या नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेविका सौ. सीमा प्रदिप कदम यांचे कल्पनेतून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणा-या नागरिकांसाठी प्रोत्साहन पर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याअंतर्गत गणपती चौक ( तळीचा कोपरा) येथे गणेश मुर्ती व निर्माल्य विसर्जन करणा-या नागरिकांपैकी पाच नशीबवान गणेश भक्तांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात येईल. या लकी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या गणेश भक्तांना पुढील प्रमाणे वस्तू रूपात बक्षिसे दिली जातील.
प्रथम क्रमांक :- रू. ११००/- पर्यंतच्या भेट वस्तू
द्वितीय क्रमांक :- रू. ९००/- पर्यंतच्या भेट वस्तू
तृतीय क्रमांक :- रू. ७००/- पर्यंतच्या भेट वस्तू
चतुर्थ क्रमांक :- रू. ५००/- पर्यंतच्या भेट वस्तू
पाचवा क्रमांक : रू. ३००/- पर्यंतच्या भेट वस्तू
लकी ड्रॉ करीता सूचना :
१) लकी ड्रॉ करीता कोणतीही प्रवेश फी नाही. फक्त मुर्ती गणपती चौक येथील कृत्रिम तलाव/कुंडांमध्ये विसर्जन करणे आवश्यक असेल.
२) आपली मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करुन नाव नोंदणी करून लकी ड्रॉ कूपन घ्यावे.
३) नाव नोंदणी शक्यतो कुटुंबातील शालेय विद्यार्थी / महिला यांचे नावे करावी.
४) एका गणेश मुर्ती करीता एकच कूपन घ्यावे.
५) दि. १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२१ दरम्यान कृत्रिम तलावात गणेश विसर्जन विचारात घेतले जाईल.
६) दि. २० सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७.०० वाजता पाच नशीबवान "पर्यावरण रक्षक गणेश भक्तांची" निवड लकी ड्रॉ पद्धतीने केली जाईल.
१०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांची दुसऱ्या दिवशी नावे प्रसिद्ध केली जातील.
प्रितम निकम ( राधाकृष्ण डिजिटल फोटो स्टुडिओ सोमवार पेठ, शिराळा) यांच्याकडून विजेत्यास मिळेल 4x 6 एक फोटो तर सुखदेव गुरव (अजय फोटो वाकुर्डे खुर्द) यांच्या कडून आयडेंटी ८ फोटो
टीप-एका व्यक्तीला एकच वेळ फोटो मिळेल
अजून वेळ गेलेली नाही आपल्या सहभाग नोंदवा
अधिक माहितीसाठी वाचा👇
अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.
शिव न्यूजने आज २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.
प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.
आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.
आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.
0 Comments