शिराळा (प्रतिनिधी) : 22 सप्टेंबर रोजी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवस आहे. यानिमित्त सांगली जिल्यातील सर्व दहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख व युवा कार्यकर्त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. ना. शरदचंद्र पवारसाहेब यांचा जीवनपट, समाजकारण व राजकारणातील अनुभव कथन असलेले "लोक माझे सांगाती" या पुस्तकांच्या १ हजार प्रती व लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या जिवनपटावरील ‘बापू’ या पुस्तकाच्या 500 प्रतिंचे वाटप करण्यात येणार आहे. ही माहिती वाढदिवस सत्कार समितीमार्फत पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शिव सामान्यज्ञान स्पर्धा सहभागी व्हा
जिंका १५०० व १००० रुपयांची भेट वस्तू
सत्कार समिती प्रमुख म्हणाले युवा नेते, जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांना पणजोबा देशभक्त स्वातंत्र्य सैनिक स्व. आनंदराव नाईक (तात्या) तसेच आजोबा लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक (अप्पा), वडील व शिराळा विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल, लोकप्रिय आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांच्याकडून समाजकारण, औद्योगिक, शेती, साहित्य व सांस्कृतिक प्रगतीचा वारसा मिळाला आहे. या वारश्याचे तंतोतंत पालन करत त्यांनी गेल्या पाच वर्षापासून समाजिक वाटचाल चालू ठेवली आहे. दरम्यान त्यांनी केलेल्या कामाची व त्यांच्या अंगी असलेल्या गुणांची पारख करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब व जिल्हा पातळीवरील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. तेंव्हापासून ते पक्षाचे काम, ध्येय धोरणे राबविणे, संघटन करून युवकांना प्रेरित करण्याचे काम जिल्ह्यात करत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. पवारसाहेब हे देशातील लोकविलक्षण नेते आहेत. त्यांनी पाच दहा दशकाहून अधिक काळ देशाच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. म्हणून त्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्त्यांना व्हावी व त्यांच्यामध्ये समाजकार्याची अधिक आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत "लोक माझे सांगाती" या पुस्तकांच्या १ हजार प्रती व लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या लोकाभिमूख कार्याची माहिती व त्यांचा जिवनपट उलघडणाऱ्या ‘बापू’ या पुस्तकाच्या ५०० प्रतिंचे वाटप जिल्ह्यातील सर्व तालुक्यात करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यालयात पुस्तकांच्या वाटपाचा कार्यक्रम होईल. ज्या त्या तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी एकत्र येऊन २२ सप्टेंबर रोजी कार्यक्रम घेतील, असे नियोजन केले आहे.
ते म्हणाले, वाढदिवसाच्या निमित्ताने शिराळा तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविक व अंगणवाडी सेविकांना शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत कोविड काळात दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. हा उपक्रमही २२ सप्टेंबर रोजी शिराळा तालुक्याच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते करतील.
२२ सप्टेंबर या वाढदिनी मा. विराज नाईक त्यांच्या चिखली (ता. शिराळा) येथील निवासस्थानी अथवा जिल्ह्यात कोठेही सत्कार, हार, पुष्पगुच्छ आदी स्वीकारण्यास उपलब्ध असणार नाहीत. याची नोंद त्यांच्यावर, राष्ट्रवादी काँग्रेसवर व नाईक कुटूंबियावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी घ्यावी.
शिव सामान्यज्ञान स्पर्धा भाग दोन
जिंका १५०० व १००० रुपयांची भेट वस्तू
0 Comments