BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लॉकडाऊन मधल्या | ऑनलाईन पॅटर्नने| ते 9 जण होणार |भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी| According to the online pattern | in the lockdown | they will be |9 Indian top | civil service officers

 फोटोवर क्लिक करून पहा काय आहे 

‘बार्टी’ कडून प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील भावी अधिकाऱ्यांचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक

 

 

लॉकडाऊन मधल्या | ऑनलाईन पॅटर्नने|  ते   9 जण  होणार |भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी| According to the online pattern | in the lockdown | they will be |9 Indian top | civil service officers

मुंबई (दि. 24)  : लॉकडाऊन मधला  ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व राज्य सरकारच्या मदतीने प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील 9 विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी भावी अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व करावे तेवढे कौतुक थोडेच आहे! तुम्हा सर्वांचा गर्व वाटतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बार्टीच्या यूपीएससीत यश मिळवलेल्या 9 विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

बार्टी व राज्य सरकारच्या मदतीने ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन जानेवारी 2021 मध्ये यूपीएससीच्या परीक्षा झालेल्या विद्यार्थ्यांपैकी लेखी परीक्षा व त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये यूपीएससी मार्फत झालेल्या मुलाखती व अन्य चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करून बार्टीच्या 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून, हे 9 जण भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी होणार आहेत.

लॉकडाऊन मधल्या | ऑनलाईन पॅटर्नने|  ते   9 जण  होणार |भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी| According to the online pattern | in the lockdown | they will be |9 Indian top | civil service officers


यामध्ये सुहास गाडे (रँक-349), आदित्य जीवने (रँक-399), शरण कांबळे (रँक-542), अजिंक्य विद्यागर (रँक-617), हेतल पगारे (रँक-630), देवव्रत मेश्राम (रँक-713), स्वप्नील निसर्गन (रँक-714), शुभम भैसारे (रँक-727) आणि पियुष मडके (रँक-732) या भावी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बार्टी मार्फत दरवर्षी राज्यातील निवडक विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे प्रायोजकत्व देण्यात येते. परंतु मागील काही महिन्यात कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रायोजकत्व देण्याऐवजी ऑनलाईन प्रशिक्षण व अन्य मदत केली जात होती. परीक्षेच्या पूर्वतयारी साठी सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश आमच्या प्रयत्नांना सार्थक करणारे आहे, या विद्यार्थ्यांनी भावी जीवनात मोठे अधिकारी म्हणून काम करताना देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे. सामान्य व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सतत आपल्या पदाचा सकारात्मक वापर करावा, अशी अपेक्षा व्यक्त करत धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

लॉकडाऊन मधल्या | ऑनलाईन पॅटर्नने|  ते   9 जण  होणार |भारतीय सर्वोच्च नागरी सेवेत अधिकारी| According to the online pattern | in the lockdown | they will be |9 Indian top | civil service officers


खालील फोटोवर क्लिक करून पहा


आपण अजून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड केले नसेल तर खालील फोटोवर क्लिक करा



शिव सामान्यज्ञान स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी

अशी असेल ही शिव सामान्यज्ञान स्पर्धा

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

 भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या  मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे. 

3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.

4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना  स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल. 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.


Post a Comment

0 Comments