BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खून प्रकरणी त्या चौघांना पाच दिवस पोलीस कोठडी

 


शिराळा:मांगले ता.शिराळा येथे  प्रेम प्रकरणातून  मारहाण केलेल्या  शिवतेज विनायक घाटगे  रा.सातवे ता.पन्हाळा या युवकाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या भाऊसो बाजीराव दळवी,पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसो दळवी, अजय विजय दळवी या चौघांना शिराळा पोलिसांनी आज शिराळा न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवार (ता.१४) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याबाबत दीपक यशवंत हांडे (वय ४८) रा. सातवे ता.पन्हाळा यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली होती.

याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, दीपक हांडे हे त्यांची फकिरवाडी येथे विकलेली म्हैस सोडण्यासाठी शिवतेज सोबत त्याच्या  चुलत्यांचा टेम्पो घेऊन जात होते.दरम्यान सहा महिन्यांपूर्वी मुलगी पळवून नेल्याचा राग मनात धरून  मोटर सायकल वरून येऊन मांगले कांदे रोडवर सावर्डे फाटा येथे भाऊसो बाजीराव दळवी,पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसो दळवी, अजय विजय दळवी,सर्व रा.सातवे ता.पन्हाळा यांनी शिवतेजला मारहाण केली.त्या ठिकाणाहून त्यास मोटरसायकल वरून दुसरीकडे नेऊन पुन्हा मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला होता.

  हा  घडला प्रकार हांडे  त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितला. नातेवाईकानी मांगले भागातील घटनास्थळी धाव घेऊन त्याला कोडोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तो चालत आणि बोलत होता. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरात आणले. पण मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पुढील तपास  शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत.



अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments