BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लोकनेते फत्तेसिंगराव नाईक आप्पा सहकारी दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 

बिऊर (ता. शिराळा) : येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक आप्पा सहकारी दूध संघाच्या अधिमंडळाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत, तर दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक अध्यक्षस्थानी होते. या वेळी संघामार्फत संघास उत्तम प्रतीचा दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, वर्षाकाठी जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, पाटण, वाळवा व शाहूवाडी या डोंगरी तालुक्यातील दूध संस्थानां प्रोत्साहन म्हणून बक्षीस व सत्कार तसेच संघातील कामगारांची गुणवंत मुलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, शिवशंभो दूध संघ, पाटणचे अध्यक्ष आदिकराव पाटील, संचालक अनिल पाटील, बबनराव ढोले, एस. वाय. यमगर, मानसिंग पाटील, सौ. मंगल पाटील, शिवाजी लाड, माणिक दशवंत, संजय पाटील, श्रीरंग भोसले, प्रदीप यादव, सदाशिव संकपाळ, व्यवस्थापक दिनकर नायकवडी व रवींद्र यादव आदी मान्यवर, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते.


१०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांची दुसऱ्या दिवशी नावे प्रसिद्ध केली जातील.

प्रितम निकम (  राधाकृष्ण डिजिटल फोटो स्टुडिओ सोमवार  पेठ, शिराळा) यांच्याकडून विजेत्यास मिळेल  4x 6 एक फोटो तर  सुखदेव गुरव (अजय फोटो वाकुर्डे खुर्द) यांच्या कडून आयडेंटी  ८ फोटो 

टीप-एका व्यक्तीला एकच वेळ फोटो मिळेल

अजून वेळ गेलेली नाही आपल्या सहभाग नोंदवा

अधिक माहितीसाठी वाचा👇

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने आज २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments