मांगरूळ : ५ सप्टेंबर १९३० रोजी ब्रिटीशांनी केलेल्या बेझूट गोळीबारात हुतात्मा झालेले मांगरुळ गावचे धोंडी संतू कुंभार, सिताराम उर्फ शंकर भाऊ चांभार (माने ) यांना हुतात्मा दिनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ असणाऱ्या हुतात्मा स्तंभास हुतात्मा वारसदार दिलीप कुंभार, सुधीर कुंभार यांनी पुष्पचक्रान अभिवादन केले. मांगरुळ ग्रामस्थ, श्री चिंचेश्वर वाचनालय पदाधिकारी, गावातील आजी माजी शिक्षक , सरपंच रंजना कुंभार, उपसरपंच सुनंदा मस्के, माजी सैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
हुताम्यांच्या स्मृती कथन करणारी मनोगते माजी अभियंता विश्वास शिंदे, शंकरराव पाटील यांनी मांडली. ग्रामस्थ, श्री चिंचेश्वर वाचनालय पदाधिकारी यांचेवतीने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 'शिक्षक दिनी' जवळपास शंभर आजी, माजी शिक्षकांचा, माजी सैनिकांचा, विविधांगी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तलाठी अभिजीत मस्के, यांच्या कोरोना कार्यकाळातील विशेषतः सेवेचे कौतुक करत त्यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनासह सुत्रसंचालन शिक्षक हिंम्मतराव नायकवडी यांनी केले.
0 Comments