BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विराज नाईक यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 

विराज कारखाना स्थळावर ज्योतिबा मंदिर परिसरात वृक्षारोपण प्रसंगी जनरल मॅनेजर युवराज गायकवाड, सुभाष शेटे,रवी पाटील,सागर चव्हाण, अशोक साळुंखे, अभिजीत पाटील, सुभाष पाटील, संदीप कदम आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शिराळा :सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराजदादा नाईक यांचा वाढदिवस विराज उद्योग समूहात सामाजिक, आध्यात्मिक स्वरूपाने व कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यात आला. यावेळी विराज कारखाना परिसरातील ज्योतिबा पादूका मंदिरात अभिषेक, पूजाविधी संपन्न झाला. विराज कारखाना प्रशासनाकडून विराज कॅटल फिडस कारखाना परिसरात वनौषधी व फळ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
       हा विश्वास व विराज उद्योग समूहासह शिराळा विधानसभा मतदारसंघात उत्साहात साजरा करण्यात आला. विराज कारखाना परिसरात ज्योतिबा पादुका देवालय आहे. या मंदिराच्या परिसरात गेल्या पाच सहा वर्षापासून विराज उद्योग समूहातील प्रशासनाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आदी प्रबोधनात्मक सामाजिक कार्य पार पाडली जात आहेत.  या मंदिर परिसराचे सुशोभिकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिर परिसराला एक देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे. 
      यावेऴी विराज कारखान्याचे जनरल मॅनेजर युवराज गायकवाड म्हणाले, काही वर्षापूर्वी या ज्योतिबा पादुका मंदिर ठिकाणी माळरान होते. परंतु या माळरानावरती उद्योग उभारण्याचे स्वप्न आमदार मानसिंगराव नाईक यांनी पाहिले. त्यांच्या स्वप्नाला वास्तवाचा आकार मिळाला आणि विराज उद्योग समूहाची निर्मिती झाली आहे. विराज उद्योगसमूहाच्या प्रशासनाची बहुतांश जबाबदारी आमदार मानसिंग भाऊ यांनी विराजदादा यांच्याकडे सोपवली. यामध्ये विराजदादा यांनी सर्वांगीण प्रशासन राबवून उद्योग समूहाच्या यशात सातत्य राखले आहे.गेली अनेक वर्षापासून हा विराज उद्योग समूह यशाचे आलेख पादाक्रांत करत पुढची वाटचाल करीत आहे.

      यावर्षी सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने वाढदिवस नैसर्गिक व अध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला.विराज कारखाना प्रशासनाकडून ज्योतिबा पादुका मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. आमदार मानसिंग भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या अनेक वर्षापासून या मंदिरात अभिषेक घालून फार मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन केले जात होते.  यावेळी जनरल मॅनेजर युवराज गायकवाड, सुभाष शेटे,रवी पाटील,सागर चव्हाण, अशोक साळुंखे, अभिजीत पाटील, सुभाष पाटील, संदीप कदम आदी अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्यासाठी

सर्व स्पर्धकांचे हार्दीक अभिनंदन

अशी असेल ही शिव सामान्यज्ञान स्पर्धा

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

 भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या  मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे. 

3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.

4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना  स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल. 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.



Post a Comment

0 Comments