BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विश्वास कारखाना| रसा पासून इथेनॉल करणारा |आमदार मानसिंगराव नाईक | VishwasFactory | Ethanol maker from juice |MLA Mansingrao Naik

 

चिखली (ता.शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन  सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक सोबत बाबासाहेब पाटील,विराज नाईक 

विश्वास कारखाना| रसा पासून इथेनॉल करणारा |आमदार मानसिंगराव नाईक | VishwasFactory | Ethanol maker from juice |MLA Mansingrao Naik

 

 

शिराळा, ता.२४: विश्वासराव नाईक कारखाना पुढील वर्षी उसाच्या रसापासून प्रतिदिनी १ लाख लिटर इथेनॉल तयार करणारा प्रकल्प कार्यान्वित करणारा असून पुर पट्यातील ऊस प्राधान्याने उचलण्यासाठी विशेष कार्यक्रम आखणार असल्याचे प्रतिपादन विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक  यांनी केले

चिखली (ता.शिराळा) येथे विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या ५१ व्या वार्षिक सर्वसाधारण ऑनलाईन  सभेत बोलत होते.

यावेळी नाईक म्हणाले, सभासद शेतकऱ्यां प्रमाणे सभासद असणाऱ्या सोसायट्यांना साखर देण्याबाबत विचार करू. उसा प्रमाणे साखरेची किंमत वाढवून केंद्र सरकारने साखरेचा दर ३६०० केला तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. पूरपरिस्थिती मुळे ऊस गाळ करण्यासाठी अडचणी येणार असल्या तरी तो तोटा सहन करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी रसा पासून इथेनॉल केल्या शिवाय पर्याय नाही. इथेनॉल व साखरेचे उत्पादन ५० टक्के केले जाईल. सहवीज निर्मिती १५ ऐवजी २१ मेगावॅट करण्यात येईल.पूराच्या पाण्याने कमी हानी होणारे ऊस बियाणे विकसित करण्याबाबत व्ही. एस. आय. ला विनंती करणार आहे. सर्जेरावदादा नाईक बँकेत ज्या शेतकऱ्यांचे, वाहतूकदार व ठेवीदारांचे पैसे आहेत ते निश्चित परत मिळतील. खातेदारांनी पैसे मागणीसाठी बँकेकडे अर्ज करावेत.वाकुर्डेच्या तिसऱ्या टप्प्यातील टेंडर लवकरच निघेल.

विश्वास कारखाना| रसा पासून इथेनॉल करणारा |आमदार मानसिंगराव नाईक | VishwasFactory | Ethanol maker from juice |MLA Mansingrao Naik


 

अहवाल व नोटीस वाचन कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले.कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, सुतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, माजी सभापती साम्राटसिंग नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, आपला बझार समुहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक, जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, डॉ. शिमोनी नाईक, दीपाली नाईक, भूषण नाईक, संचालक  दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, मानसिंग पाटील, विश्वास कदम, सर्व संचालक उपस्थित होते. आभार संचाकल हंबीरराव पाटील यांनी मानले.

विश्वास कारखाना| रसा पासून इथेनॉल करणारा |आमदार मानसिंगराव नाईक | VishwasFactory | Ethanol maker from juice |MLA Mansingrao Naik

शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्यासाठी


अशी असेल ही शिव सामान्यज्ञान स्पर्धा

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

 भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या  मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे. 

3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.

4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना  स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल. 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.


 


Post a Comment

0 Comments