समाजकारणाचा वारसा घेवून निघालेले एक दूरदृष्टीचे, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रातीच्या प्रगतीसाठी झटणारे उच्च विद्याविभूषीत नेतृत्च म्हणून विराज नाईक दादा यांच्याकडे आम्ही पहात आहोत. नाईक घराण्याचा समाजकारणाचा वारसा व आमदार मानसिंगभाऊं नाईक यांच्या विकासवादी नेतृत्व गुण घेवून विराजदादांनी घोडदौड सुरू ठेवली. शिराळा विधानसभा मतदार संघात विकासाची किमयाच केली आहे. विश्वासराव नाईक साखर कारखाना बरोबरीने विश्वास उदयोग व विराज उदयोग समुह निर्माण करण्याचे काम भाऊंनी केले. त्यामुळे आज भाऊ शिराळा वाळवा तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. भाऊंचे कार्य जवळुन पाहण्याचे भाग्य त्यांचे चिरंजीव आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विराज नाईक (दादा) यांना लाभले. आपल्या घराण्याची परंपरा पुढे नेन्यासाठी भाऊचे नेतृत्व व मार्गदशनाखाली दादांनी ५ वर्षा पूर्वी राजकारण व समाज कारणामध्ये सकीय सहभाग घेतला. सर्व प्रधम भाऊंनी त्यांच्यावर विराज उदयोग समुहाची जबाबदारी दिली.
दादांनी आपल्या बुद्धीमत्तेच्या कसोटीवर ती जबाबदारी लिलया पार पाडली. विराज उदयोग समुह प्रगती पथाच्या एका नव्या वळणावर नेऊन ठेवला आहे. विराज उदयोग समुह यशस्वीपणे संभाळण्याचा प्रमाणिक प्रयत्न ते करीत आहेत. त्यातुनच शिराळा, वाळवा विधानसभा मतदार संघामध्ये एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला. विराज नाईकदादा हे सुसंस्कृत, उच्च विदयाविभुषीत, शांत व संयमी असलेमूळे युवकांच्या मनामध्ये आदरयुक्त स्थांन त्यांनी निर्माण केले. आपल्या भागाच्या विकासाकामी तालुक्यामध्ये त्यांनी गाववार दौरे करून भौगोलिक परिथितीचा अगदी जवळुन अभ्यास केला आहे. सर्व सामान्य लोकांच्या अनेक समस्यांचे निराकारण पंचायत समिती, तहसिल ऑफिस मधील कामे अगदी सहजपणे पुर्ण करण्याचा दादांनी प्रयत्न केलेला आहे.
राजकीय दृष्टया युवक नेता म्हणुन मा. आमदार भाऊंचे नेतृत्व बळकट करण्यासाठी तसेच पक्षीय संघटन मजबुत करण्याकामी गाववार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा निर्माण करण्याचे काम दादा आजही करत आहेत. गेल्या ३ वर्षापुर्वी व याही वर्षी अतीवृष्टीमुळे वारणा व कृष्णा नदयांना आलेल्या महापुरामुळे नदीच्या काठावर असणाऱ्या अनेक गावांचे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड नुसकान व हाल झाले. या विपरीत परिस्थीतीमध्ये आपल्या भागाचा दौरा करून लोकांना धीर व आधार देण्याचे काम दादांनी केले. तसेच आमदार भाऊच्या मार्गदर्शनाखाली लोकांना आरोग्य सुविधा जीवनावश्यक वस्तु तसेच संसार उपयोगी साहित्य जनावरांना पशुखादय उपलब्ध करून वाटप करण्याचे काम केले आहे.
तसेच २ वर्षा पासुन आलेल्या कोरोना सारख्या वैश्विक महामारीमुळे लोकांचे झालेले हाल पाहुन दादा सतत व्यवस्थित होते. आपण या परथितीमध्ये लोकांना काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार ते सतत करीत होते. त्याकामी त्यांनी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उप केंद्र तसेच ग्रामिण जिल्हा उप रुग्नालय येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर मशिन, सानिटायझर मास्क फेस सिल्ड मास्क, पिपीई किट इ. साहित्याचे वाटप केले. आरोग्य सेविका, तसेच अंगणवाडी सेविका यांना सुदधा गाव स्तरावर या साहित्याचे वाटप केले.
तालुक्याचे तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना वरील सर्व साहित्य देण्याचा अभिनव उपक्रम दादांनी राबवला आहे. तसेच तालुक्तातील सर्व गावामध्ये ग्रामपंचायत व आरोग्य सेविका यांच्या माध्यमातुन लोकांचे आरोग्य सुरक्षित रहावे या कामी कोरोना या साथीमध्ये अर्सेनिक अल्बम गोळयांचे वाटप गाववार प्रत्येक कुटूंबापर्यंत पोहोच करणेचे महत्वपुर्ण काम करून लोकांना आदर देण्याचे काम केले.
मधल्या काळामध्ये कोरोनाची लाट कमी झाली असता विराज नाईक दादा यांच्या संकल्पनेतुन महिला सबलिकरण कार्यक्रमाअंतर्गत शिराळा विधानसभा मतदार संघातील सर्वगावामध्ये महिलांना कमी दरामध्ये आटा चक्की वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना झाला. आपल्या घरामध्ये आटा चक्की वापरायला शिकण्याचा फायदा ग्रामिण भागातील महिलांना झाला. हा फायदा फक्त दादांच्या नेतृत्वामुळे होऊ शकला.
वरील सर्व कामांचा व या २ वर्षातील कठीण परिस्थीतीमध्ये दादांनी केलेल्या समाज उपयोगी कामाची दखल घेवुन राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतरावजी पाटील साहेब व पक्षातील वरीष्ठ मंडळीनी मा. श्री. विराज नाईक दादा यांना सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली त्यातुनच खऱ्या अर्थाने विराज नाईक दादा यांचे बहुआयामी नेतृत्व जिल्हाभर पोहचले. दादांच्या मनामध्ये सर्व सामान्य लोकांच्या प्रती असणारी अपुलकी तसेच सर्व सामान्य कार्यकर्त्याशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध हे सर्व क्रियाशिल दादांच्या माध्यमातुन अनुभवायला येत आहे हे मी माझे भाग्य समजतो. जिल्हाअध्यक्ष पदी निवड झालेनंतर दादांनी सर्वच तालुक्यांना भेटी देऊन पक्षीय संघटना मजबूत करणे कामी युवकची तालुका कार्यकारणी करणे कामी प्रयत्न केले असुन ते काम अंतीम टप्यात आहे. जिल्हयातील सर्वच तालुक्यामध्ये युवकांना वाटणाऱ्या समस्या जाणून घेण्याचे काम दादा करीत असुन जिल्हयातील युवकांच्यासाठी काहीतरी भरीव काम करणेचा दादांचा मानस आहे. दादासारख्या बहुआयामी, सुसंस्कृत व उच्चविदयाविभुषीत नेतृत्वाने शिराळा तालुक्यातील पाचूंब्री या छोटया गावातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला शिराळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करणेची संधी दिली हे माझे भाग्य समजतो.
दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी मा विराज नाईक दादा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. दादांना उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थ ना.मा.ना. जयंतराव पाटील साहेब तसेच आमचे नेते आदरणीय आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ) यांच्या मार्गदर्श नाखाली विराज नाईकदादा यांच्या कार्याचा सुगंध सर्व जिल्हाभर सर्वदूर पोहचू दे. हीच सदिच्छा.
हर्षद बाळासो माने-अध्यक्ष (शिराळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस)
-----------------------------------------------------------
युवकांचे आशास्थान : विराजदादा नाईक
0 Comments