BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा |Tourism Chariot | Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |



 

 २७ सप्टेंबर हा दिवस “जागतिक पर्यटन दिन” म्हणून  साजरा केला जातो.  त्या निमित्ताने आयोजित केलेल्या पर्यटन सारथी या महा प्रश्नमंजुषा या स्पर्धेची ऑनलाईन प्रश्नपत्रिका उद्या सोमवारी सकाळी आपल्या सर्वांना पाठवत  आहोत.सहभागी व्हा आणि मिळवा आकर्षक सहभाग प्रमाणपत्र

फोटोवर क्लिक करून पहा काय आहे 

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा 

|Tourism Chariot Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |

 

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा 

|Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |

 
फिरायला कोणाला आवडत नाही. सततच्या कामाने कंटाळून अनेक जण पुन्हा नव्या उमेदीने काम करण्याची ऊर्जा मिळावी म्हणून बाहेर फिरायला जातात.अर्थात हे फिरणे प्रत्येकांच्या आर्थिक बजेटवर अवलंबून असते. ज्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते ते जगाचे पर्यटन करतात.  चांगली आर्थिक स्थिती असणारे देशाचे तर मध्यम असणारे महाराष्ट्राचे पर्यटन करताना.सर्व सामान्य व रोजनदारी करणारे जवळच्या जिल्ह्यातील पर्यटन पसंत करतात.ज्यांना एक दिवस विरंगुळा हवा असतो .ते आपल्या जिल्ह्यातील अथवा तालुक्यातील एखाद्या ठिकाणची निवड करून देवदर्शन व पर्यटन असा दुहेरी आनंद घेत असतात.आपल्या आर्थिक परिस्थिती अथवा कामाच्या व्यापातून ज्यांना बाहेर जाता येत नाही ते युट्युब,फेसबुक, पुस्तके यांच्या माध्यमातून आनंद घेत असतात.एकंदरीत पर्यटनाचा आनंद हा प्रत्यक्ष जाता आले नाही तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने घेतलाच पाहिजे.ज्या गोष्टी आपणाला पाहता येत नाहीत किमान त्यांची माहिती किंवा त्यांचे ज्ञान आपणाला असायलाच हवे म्हणून आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून पर्यटन सारथी ही जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन महा प्रश्न मंजुषा घेत आहे. ही स्पर्धा राज्यस्तरीय आहे.यात कोणी ही सहभाग घेऊ शकतात.वयाची अट नाही.प्रत्येक सहभागी स्पर्धकांना एक आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. यात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख व महत्वाच्या पर्यटनावर प्रश्न आहेत.त्यासाठी चार पर्याय आहेत.योग्य त्या पर्यायावर क्लिक करून उत्तरे द्या.आणि घर बसल्या महाराष्ट्र पर्यटनाचा आनंद लुटून प्रमाणपत्राचे मानकरी व्हा.
  
स्पर्धा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर २०२१

म्हणून करतात जागतिक पर्यटन दिन

१९८० पासून जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) याच दिवशी साजरा करण्यास सुरवात झाली कारण संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थे (UNWTO)ची स्थापना १९७० मध्ये याच दिवशी झाली होती. म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पर्यटन | दिनानिमित्त पर्यटन सारथी महा प्रश्नमंजुषा स्पर्धा 

|Tourism Chariot |  Grand Quiz Competition | on the occasion of World Tourism Day |          

फोटोवर क्लिक करून पहा काय जादू आहे

पर्यटन सारथी ऑनलाईन महा प्रश्नमंजुषा स्पर्धा


उद्या सोमवारी २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त होणाऱ्या राज्यस्तरीय ऑनलाईन 
"पर्यटन सारथी " या सर्व वयोगटासाठी खुल्या असणाऱ्या  स्पर्धेत सहभागी व्हा आणि मिळवा सहभाग प्रमाणपत्र. या स्पर्धेचा कालावधी २७ सप्टेंबर ते ७ नोव्हेंबर दरम्यास असणार आहे. 

------–-------------------------------------------------–---------------------------------------------------
आपणाला पर्यटन सारथी बरोबर शिव सामान्यज्ञान  स्पर्धेत सहभागी होऊन रुपये १५०० व १००० ची भेटवस्तु जिंकण्यासाठी संधी.

आपण अजून ही शिव सामान्यज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ शकत


अशी असेल ही शिव सामान्यज्ञान स्पर्धा

अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.शिव न्यूजने २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याचहेतूने आम्ही गणेशोत्सवा निमित्ताने शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ केला. त्यास वाचकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

 भाग 1 साठी आपण 100 गुण मिळवणा-या स्पर्धकांसाठी राधाकृष्ण फोटो स्टुडिओ शिराळचे मालक प्रीतम निकम व अजय फोटो वाकुर्डे खुर्दचे मालक सुखदेव गुरव यांनी विजेत्यांचे आठ आयडेंटी फोटो व 4 बाय 6 आकाराचा एक फोटो बक्षीस ठेवले आहेत. हे बक्षीस 19 सप्टेंबर 2021पर्यंतच्या विजेत्यांना सन्मानपुर्वक दिले जाईल. या पुढील प्रश्नपत्रीका 2 ते 20 पर्यंतच्या स्पर्धकांना 100 गुण मिळवल्यास वैयक्तीक बक्षीस मिळणार नाही. पण जे 1 ते 20 प्रश्नपत्रीका सोडवुन प्रत्येक प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळवतील अशा स्पर्धकांना 1 व 2 नंबरच्या रुपये दिड हजार व रुपये एक हजारच्या बक्षीसासाठी घेतल्या जाणा़-या अंतिम 21 व्या प्रश्नपत्रीकेत सहभागी होवुन बक्षीसाचे मानकरी होता येईल.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक आठवड्याला नविन प्रश्नपत्रीका पाठवली जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या  मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे.या स्पर्धेत पहिले 2 क्रमांक काढले जातील. प्रथम क्रमांकासाठी सुशिल मेगा मार्ट व सुशिल मेडिकल शिराळा यांच्याकडुन 1500 रुपयांची भेट वस्तु तर दुस-या क्रमांकासाठी तुषार एंटरप्राईजेस व लेडिज कलेक्शन शिराऴा यांच्याकडुन रुपये 1000 रुपयांची भेट वस्तु मिळेल.सर्व सहभागी स्पर्धकांना यशराज ॲग्रो - सोनालीका ट्रॅक्टर शिराळा यांचेकडुन सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. 

नियम व अटी-

1) ही ऑनलाईन स्पर्धा सर्वांसाठी खुली.

2) सहभाग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 20 प्रश्नपत्रीका सोडवणे गरजेचे आहे. 

3) ज्यांना 20 प्रश्नपत्रीकेत 100 गुण मिळतील अशा स्पर्धाकांचा वेगळा व्हाटस् अॅप ग्रुप करुन त्यांना 21 वी प्रश्नपत्रीका दिली जाईल. त्या प्रश्नपत्रीकेत पर्यायी उत्तरे नसतील. कमी वेळात 100 गुण मिळतील त्यांना अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक दिला जाईल.

4) 21 वी प्रश्नपत्रीका कोणत्या वेळेत व तारखेला ग्रुपवर शेअर केली जाईल याची पुर्व कल्पना  स्पर्धकांना ग्रुपवर दिली जाईल. 

4)काही कारणास्तव स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार स्पर्धा संयोजकांना राहिल.



Post a Comment

0 Comments