BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राबणारे हात सुखी असतील तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल-आमदार मानसिंगराव नाईक,

 

शिराळा ः येथील संत गाडगेबाबा स्मृति भवनात दत्तात्रय पाटील गिरजवडेकर यांनी संपादन केलेल्या मारुती रोकडे यांच्या ‘कामगार चळवळ’ या पुस्तकाचे प्रकाशन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. 

ज्येष्ठ विचारवंत धनाजी गुरव प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी, त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. राज्यकर्त्यांकडे त्याच्या न्यायीक हक्कासाठी भांडले पाहिजे. राबणारे हात सुखी असतील तरच खऱ्या अर्थाने देशाची प्रगती होईल.

कॉ.धनाजी गुरव म्हणाले, शिराळा तालुक्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जोरावर विकास सध्याची गरज आहे. चळवळीच्या माध्यमातून भविष्याचा वेध घेणार विकास साधण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.शिराळा तालुक्यातील धगधगत्या स्वातंत्र्य संग्रामाचे लेखन नव्या पिढी समोर आणणे गरजेचे आहे. आपल्या न्याय हक्कासाठी चळवळ महत्वाची आहे.

 काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. रवि पाटील, नगराध्यक्ष सुनिता निकम, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जोखे, दिपक कोठावळे, संत गाडगे महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास यादव, नगरसेवक सुनंदा सोनटक्के, प्रतिभा पवार ,सीमा कदम, मोहन जिरंगे, तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे, राजू निकम, दत्तात्रय पाटील, सुधिर दाभाडे, नतेश यादव, उदय पाटील, रवि यादव, प्रताप कदम आदी मान्यवर, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments