शिराळा (प्रतिनिधी) : येथील आपला बझारमध्ये तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस व शिराळा सखी मंच च्या संयुक्त विद्यमाने अभियंता दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराळाच्या नगराध्यक्ष सौ. सुनीता निकम तर, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक सुनंदा सोनटक्के प्रमुख उपस्थित होत्या.
कार्यक्रमात कांदे (ता. शिराळा) येथील सौ. नीता गोसावी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोसावी म्हणाल्या , यशाचे शिखर सर करताना औपचारिक शिक्षण आड येत नाही, त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि कुटुंबाची साथ असावी लागते.
सुनंदा सोनटक्के म्हणाल्या, सौ. नीता गोसावी या बांधकाम क्षेत्रात स्वतः पुढाकार घेऊन काम करीत असतात. या क्षेत्रात त्यांनी अनेक महिलांना मार्गदर्शन करून सामावून घेतले आहे. त्यामुळे अनेक संसाराला गती देण्याचं काम केलं आहे. शिवाय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या महिला तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सौ. सुनीतादेवी नाईक यांचे त्यांना नेहमी मार्गदर्शन व प्रोत्साहन राहिले आहे.
प्रारंभी सौ. नीता गोसावी यांचा सत्कार शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष साधना पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन झाला. या वेळी कल्पना गायकवाड, वैशाली कदम, रुपाली कदम, मीना पोटे, संगीता खटावकर आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
१०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या स्पर्धकांची दुसऱ्या दिवशी नावे प्रसिद्ध केली जातील.
प्रितम निकम ( राधाकृष्ण डिजिटल फोटो स्टुडिओ सोमवार पेठ, शिराळा) यांच्याकडून विजेत्यास मिळेल 4x 6 एक फोटो तर सुखदेव गुरव (अजय फोटो वाकुर्डे खुर्द) यांच्या कडून आयडेंटी ८ फोटो
टीप-एका व्यक्तीला एकच वेळ फोटो मिळेल
अजून वेळ गेलेली नाही आपल्या सहभाग नोंदवा
अधिक माहितीसाठी वाचा👇
अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडींना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.
शिव न्यूजने आज २२ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.
प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.
आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.
आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.
0 Comments