BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सरोजिनी देशमुख यांच्यावर कोकरूड येथे अंत्यसंस्कार

शिराळा: श्रीमती .सरोजनी शिवाजीराव देशमुख यांच्यावर कोकरूड येथे शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार करण्यात आले.चिरजीव सत्यजित  यांनी चितेस भडाग्नी दिला.यावेळी मुलगी डॉ. शिल्पा, फत्तेसिगराव देशमुख,जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्विनी देशमुख, धैर्यशील देशमुख उपस्थित होते.

प्रारंभी गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

खासदार संजय काका पाटील म्हणाले,स्व. शिवाजीराव देशमुख साहेबांच्या राजकीय वाटचालीत आई साहेबांचा मोठा वाटा होता. एक कुटुंब म्हणून त्यानी कार्यकर्तीना सांभाळले होते. त्यांच्या जाण्याने आभाळागत माया करणारी माऊली गमावली आहे.

आमदार मानसिगराव नाईक म्हणाले  आई साहेबांनी कार्यकत्यांना माया दिली. स्व. देशमुख साहेब यांना राजकीय जीवनात खंबीर साथ दिली. त्यांच्या जाण्याने देशमुख कुटूंबाचा आधार गेला आहे.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले,स्व. देशमुख साहेबांच्या अडचणीच्या व चांगल्या काळात ही खंबीरपणे आईसाहेब पाठीशी उभ्या राहिल्या. आम्ही सुरुवातीला साहेबांच्या बरोबर काम करत असताना त्या प्रत्येक व्यक्तीची आपुलकीने चौकशी करत होत्या. त्यांच्या जाण्याने आम्ही सर्वजण पोरके आहे.


यावेळी  दिपकबाबा शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक,युवा नेते जितेश कदम, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराज पाटील,भाजपा शिराळा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, शिराळा काँग्रेस अध्यक्ष वकील रवि पाटील,संदीप जाधव, विजय झिमूर,मनोज चिचोलकर, ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट, यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

   यावेळी अत्यविधीसाठी खा. धैर्यशील  माने, मनोज शिंदे,रणधीर नाईक ,प्रतापराव देशमुख, जे. के. बापू जाधव,वैभव शिंदे,विशाल शिंदे,जिल्हा परिषद बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, भाजपा युवा मोर्चा राज्य सचिव जयराज पाटील,आदी सह विविध गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,संस्था चे पदाधिकारी,ग्रामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments