BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सौ. मंदाकिनी प्रकाश मोरे

 

                         आदर्श शिक्षक पुरस्कार2020-21

सौ. मंदाकिनी प्रकाश मोरे

( B. A. English, B. A. सोशियॉलॉजि. M. A. D ed, B ed. D S M)         

शाळा - जि. प. शाळा  चिंचोली, ता. शिराळा, जि. सांगली     

  पात्र पदवीधर शिक्षिका.

एकूण सेवा 26 वर्षे.

34 विदयार्थी गुणवत्ता यादीत. पतंग राव कदम शिष्यवृत्ती 7वी गुणवत्ता यादीत विदयार्थी. English language competition इ.6वी ते 8वी गटात सलग 10 वर्षे (2011ते 2019-20)तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात पहिल्या 5मध्ये विदयार्थी. इंग्रजी प्रश्न मंजुषा स्पर्धा जिल्हास्तरीय  क्रमांक. कथाकथन, वक्तृत्व, लोकनृत्य, एकांकिका स्पर्धेत जिल्हास्तरावर क्रमांक प्राप्त.

     किशोरवयीन मुली व महिला  भगिनींसाठी मासिक सखी व्यवस्थापन मार्गदर्शन तसेच  तज्ञांचे मार्गदर्शन वर्गाचे आयोजन. DIECPD सांगली स सादर केलेल्या नवोपक्रमास  जिल्ह्यात द्वितीय क्रमांक व राज्यस्तरावर सादरीकरण.विविध निबंध स्पर्धेत सुयश. विज्ञान प्रदर्शन, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा जिल्हास्तरावर यश मिळाले आहे. 'वाचनामृत ','परसबाग ', आपले वाचनालय ' यासारखे अनेकविध सहशालेय उपक्रम राबविले आहेत. कविता लेखन, वृत्त पत्रातून लेखन केले आहे. पत्रकार संघामार्फत आयोजित शिक्षण परिसंवाद मध्ये सहभाग.विविध सामाजिक कार्यात सहभाग असतो.'इको फ्रेंडली होळी ', पूरग्रस्तांना मदत करतात. दरवर्षी गरीब व गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व असते. पारधी समाजातील मुलांना शाळेत दाखल करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणले.

मिळालेले पुरस्कार :

शिराळा पंचायत समिती कडून तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार.

आयुष्य फाउंडेशन तर्फे 'साधना पुरस्कार '

शिक्षक समिती शिराळा कडून 'आदर्श शिक्षक पुरस्कार '

सांगली जि. प्राथ. शिक्षक बँक कडून 'सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार '

गंगाधर न्यूज पेपर कडून 'Excellence Teacher Award '

Post a Comment

0 Comments