BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

देशभक्त आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कार वितरण

 

चिखली (ता. शिराळा) ः येथे थोर स्वतंत्र्य सेनानी, देशभक्त आनंदराव नाईक यांची ११९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने गुणवत्ता पुरस्काराचे वितरण प्रमुख पाहूणे साहित्यिक, विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विश्वास व विराज उद्योग समुहाचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, तर प्रमुख उपस्थितीत विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर, विश्वास शिक्षण समुहाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक होते. ग्रामीण कथाकार बाबासाहेब परिट यांनी स्वागत, प्रस्ताविक करून पाहुण्यांची ओळख सांगीतली. यानंतर देशभक्त आनंदाराव नाईक विशेष गुणवता पुरस्काराचे वितरण झाले. त्यामध्ये सेंट्रल डि.वाय.एस.पी. पदी निवड झालेले तुषार तानाजी गावडे (मांगले), पी.एच.डी मिळाल्याबद्दल सुनिल गायकवाड (शिराळा), प्रविण पाटील (मांगले), सागर माहिते (सागाव) व दत्तात्रय पाटील (सरुड) यांचा, तर तालुक्यात दहावी व बारावी (कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील) परिक्षेत अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. यावेळी सत्कारार्थ तुषार गावडे व सागर मोहिते यांचे मनोगत झाले. यानंतर डॉ. चोरमारे यांचे मार्गदर्शन झाले. आमदार नाईक यांचे अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमास संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, सुरेश पाटील, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील, बिरुदेव आमरे, विश्वास पाटील, शामराव माहिते, यशवंत दळवी, विष्णू पाटील, दत्तत्राय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, आनंदराव नाईक पतसंस्थेचे उपाध्यक्ष गजानन सोनटक्के व संचालक मंडळ, अधिकारी, महिला, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी, शिक्षक, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांची आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments