BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ना ढोल ना ताशा फक्त गणपती बाप्पा मोरया

 

शिराळा, ता.१०: कोरोनाच्या संकटामुळे शिराळा तालुक्यात ना ढोल ना ताशा,ना टाळ मृदुंग फक्त गणपती बाप्पा मोरया या आवाजच्या गजरात व फटाक्यांच्या आवाजात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे अत्यंत उत्साहात पण सध्या पद्धतीने आगमन झाले.

 सण उत्सवाला होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये म्हणून शासनाने या उत्सवावर काही निर्बंध घेतले आहेत.त्यामुळे गणेश आगमन व विसर्जन या दोन्ही वेळी मिरवणूक काढण्यास बंदी घातल्याने आज सर्वत्र काही मोजक्याच मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फक्त गणपती बाप्पा मोरया च्या गजरात गणपतीची प्रतिष्ठापना केली. घराघरांत ही अत्यंत सध्या पद्धतीने गणरायाचे आगमन झाले.

गावोगावी सार्वजनिक मंडळांनी आकर्षक मंडप डेकोरेशन करू मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

विश्वासराव नाईक कारखान्यावर युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळीI कार्यकारी संचालक राम पाटील व सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.


अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments