BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मोहन पवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

 


शिराळा:जिल्हा परिषद शाळा सिद्धार्थनगर आरळा शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार यांना त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक,विज्ञान प्रदर्शन,शैक्षणिक साहित्य स्पर्धा,विद्यार्थी स्पर्धा,लोकसहभातून समृद्ध शाळा,विविध शालेय सहशालेय उपक्रम,त्यांनी शाळांना मिळवून दिलेले अनेक पुरस्कार,त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार आदी विविधांगी बाबींचा विचार करून आनंदगंगा फौडेशन मिणचे कोल्हापूर या संस्थेने त्यांना हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने दादा,यांचे शुभहस्ते व मा.प्रविण यादव अर्थ व शिक्षण सभापती कोल्हापूर,मा.विनायक भोसले विश्वस्त संजय घोडावत शैक्षणिक संकुल,मा.राजाराम वरुटे राज्याध्यक्ष महाराष्ट्र् राज्य प्राथमिक शिक्षक संघ,मा.विराट गिरी प्राचार्य संजय घोडावत, मा. बाळासाहेब मुसळे उद्योगपती इचलकरंजी, मा. दादू सलगर संस्थापक सलगर चहा, माननीय तानाजी पवार अध्यक्ष ज्ञान आनंद गंगा फाऊंडेशन मिनचे कोल्हापूर व सदस्य शिक्षण समिती यांचे उपस्थितीत राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

या यशाबद्दल त्यांचे गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर,शिक्षण विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख,विष्णू दळवी,सुनंदा पाटील,आलिशा मुलाणी,केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी,हरिभाऊ घोडे तसेच शिक्षक बंधुभगिनी व संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments