BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भैरेवाडीत ८०लाखाच्या रस्ता कामाचा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

 


शिराळा (प्रतिनिधी) : उत्तर भागाच्या विकासाठी नेहमी आग्रही राहीलो आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

भैरेवाडी (ता. शिराळा) येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून एस.टी. थांबा ते येळवे धरणाकडे जाणाऱ्या 80 लाख खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

आमदार नाईक म्हाणाले, वाकुर्डे योजना, गिरजवडे प्रकल्प हे महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मी लोकप्रतिनिधी झाल्यापासून प्रयत्न केले. गिरजवडेचे काम पूर्ण तर, वाकुर्डेची कामे मार्गी लावली. या विभागातील कामे प्राधान्याने पूर्ण करण्याकडेच माझा कल राहीला आहे. 

प्रारंभी युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हर्षद माने यांनी स्वागत केले. आमदार नाईक यांच्या हस्ते कुदळ मारुन रस्ते कामाचा शुभारंभ झाला.  या प्रसंगी तालुक्याचे माजी सभापती, सदस्य सम्राटसिंग नाईक, विश्वासचे संचालक विश्वास पाटील, बाजार समितीचे संचालक अण्णा बेंद्रे व मारुती येळवे, अनंत सपकाळ, माजी सरपंच मोहन चाळके, सरपंच विलास येळवे, उपसरपंच कृष्णा माने, सोसायटी अध्यक्ष नामदेव बोबडे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. राजू बोबडे यांनी आभार मानले.


अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments