BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तडवळेत बिबट्या-मानव सहजीवन जनजागृती कार्यक्रम

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या व निसर्ग सौंदर्याने संपन्न असलेल्या शिराळा तालुक्यातील तडवळे गावामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. काही ठिकाणी पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले झाल्याच्या नोंदीही स्थानिक वनविभागाकडे झाल्या आहेत. या घटनांमुळे तडवळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेता पर्यावरण संवर्धन विषयावर काम करणाऱ्या प्लॅनेट अर्थ फाउंडेशन व प्रादेशिक वनविभाग शिराळा यांच्या संयुक्त विदयमाने ग्रामपंचायत तडवळेमध्ये दि. ०८ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी "मानव बिबट्या सहजीवन" जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये असलेली बिबट्या बद्दलची भीती व गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संस्थेच्या अभ्यासानुसार बिबट्याने ऊस शेतीस आपला अधिवास बनवला आहे व उसातच तो आपले प्रजनन करत आहे. गावातील मोकाट कुत्रे, जनावरे, तसेच उसात सापडणारे मोरे, वानर, डुक्कर, अश्या प्राण्यांवर तो आपली गुजराण करत आहे. मनुष्य हे बिबट्याचे अन्न नसल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. काही ठिकाणी बिबट्याने बकरी, रेडकू, कालवड मारल्याच्या घटना समोर  येत आहेत. त्यासाठी बंदीस्त गोठा बनवणे व आपल्या पाळीव प्राण्यांना बिबट्या पासून सुरक्षित ठेवणे हा योग्य पर्याय आहे, हे या जनजागृती कार्यक्रमातुन शेतकऱ्यांना समजवण्यात आले. जुन्नर वनविभागाने केलेल्या संशोधनातून समोर आले आहे की मांजरकुळातील बिबट्याला पिंजऱ्यात पकडून दूर सोडल्यास काही दिवसांनी तो पुन्हा मूळ जागी परत येतो, अथवा त्याची जागा नवीन दुसरा बिबट्या घेत असतो. त्यामुळे लोकांनी बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यासाठी दबाव आणू नये. ग्रामपंचायत ने गावातील परिसर स्वच्छ ठेवावा, वस्तीच्या परिसरातील लाईट चालू ठेवावी, झुडपे, तण, अडचण साफ करावी. लोकांनी गावात कचरा करू नये. घाणीमुळे डुक्कर आणि कुत्री यांची संख्या वाढते. त्यामुळे बिबट्या लोकवस्तीकडे आकर्षित होतो व मानव बिबट संघर्ष होण्याची शक्यता निर्माण होते. शेतकऱ्यांनी त्यांची गुरे, शेळ्या, मेंढ्या बंदिस्त ठेवावेत, तसेच गोठ्यात पुरेशी लाइटची व्यवस्था करावी. रात्री शेतात जाताना टॉर्च व रेडिओ चा वापर करावा, एकटे न जाता समूहाने जावे या सूचना देण्यात आल्या.  या जनजागृती कार्यक्रमात ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांसाठी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमावेळी शिराळा वनविभागाचे हनमंत पाटील, देशमुख साहेब, बाबा गायकवाड गावातील वन-कर्मचारी तसेच प्लॅनेट अर्थ फौंडेशन चे अध्यक्ष आकाश पाटील, उपाध्यक्ष  प्रणव महाजन, सदस्य प्रथमेश शिंदे , तडवळे गावातील सरपंच, इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments