BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी वडिलांच्या स्मारणार्थ मुलांना दिले टॅब व पुस्तके

 


शिराळा: पाडळी (ता शिराळा) येथील पाटील कुंटूबियांनी कोणताही धार्मिक विधी न करता वडिलांच्या आठवणी चिरकाल स्मरणात रहाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस  सत्तर हजार रुपये किमतीचे डिजिटल टॅब व ग्रंथालयासाठी पुस्तके भेट  देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

  स्व. नारायण पाटील  यांचे सुपुत्र रायगड-अलिबाग , स्थानिक निधी लेखापरिक्षा उपसंचालक सदाशिव पाटील  व आदर्श शेतकरी गणपती पाटील यांच्या संकल्पनेतून हा आदर्श सोहळा संपन्न झाला.

    कार्यक्रमास केंद्र प्रमुख सुहास रोकडे,सरपंच सत्यवान पाटील,उपसरपंच अंजली पाटील, अशोक पाटील , माजी उपसरपंच महादेव पाटील, जे बी पाटील, बाबासो पाटील ,चंद्रकांत पाटील,वसंत पाटील ,अमृत पाटील , मुख्याध्यापक विठ्ठल पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप चव्हाण ,प्रकाश शेटे, माजी सरपंच अर्जुन पाटील , विकास शहा, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील,आनंद पाटील,सर्जेराव पाटील,संभाजी पाटील,प्रतिक पाटील शिक्षक महादेव देसाई,बालकृष्ण गवळी, आशाकिरण पाटील,तृप्ती मुळीक , मंगल पाटील , अंगणवाडी ताई , पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments