BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

युवक मृत्यू प्रकरणी चौघांना अटक

 


शिराळा:  प्रेम प्रकरणातून  मारहाण केलेल्या  शिवतेज विनायक घाटगे या युवकाच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी भाऊसो बाजीराव दळवी,पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसो दळवी, अजय विजय दळवी या चौघांना शिराळा पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत दीपक यशवंत हांडे (वय ४८) रा. सातवे ता.पन्हाळा यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती.

याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी, दीपक हांडे हे त्यांची फकिरवाडी येथे विकलेली म्हैस सोडण्यासाठी शिवतेज सोबत त्याच्या  चुलत्यांचा टेम्पो घेऊन जात होते.दरम्यान सहा महिन्यांपूर्वी मुलगी पळवून नेल्याचा राग मनात धरून  मोटर सायकल वरून येऊन मांगले कांदे रोडवर सावर्डे फाटा येथे भाऊसो बाजीराव दळवी,पतंग विकासराव दळवी, सौरभ भाऊसो दळवी, अजय विजय दळवी,सर्व रा.सातवे ता.पन्हाळा यांनी शिवतेजला मारहाण केली.त्या ठिकाणाहून त्यास मोटरसायकल वरून दुसरीकडे नेऊन पुन्हा मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला होता.

  हा  घडला प्रकार हांडे  त्यांच्या नातेवाईकांना फोन करून सांगितला. नातेवाईकानी मांगले भागातील घटनास्थळी धाव घेऊन त्याला कोडोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याला प्रथम उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तू चालत आणि बोलत होता. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी त्याला कोल्हापुरात आणले. पण मध्यरात्री त्याची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी त्याला सीपीआर रुग्णालयात हलवले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास  शिराळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत.

Post a Comment

0 Comments