शिराळा,ता.५:काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून शिराळा तालुक्यावर बारीक लक्ष ठेवणे माझी नैतिक जबाबदारी आहे.आम्ही तुमच्या पाठीशी सर्व ताकद उभी करून या तालुक्यातील काँग्रेसला पुन्हा काँग्रेसला गतवैभव मिळवून देऊ असे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, यांनी केले.
शिराळा येथे नागमणी विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी कदम म्हणाले,हा तालुका सुरवाती पासून काँग्रेसच्या विचारांचा असल्याने या पुढील काळात येथील कार्यकर्त्यांना अधिक खतपाणी घालून नवी काँग्रेस उभा करू. सर्व कमिटीत शिराळा तालुक्याला झुकते माप मिळेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही.
चांदोली परिसरात असणारे प्रश्न व वाकुर्डे योजने बाबत लोकांच्या असणाऱ्या अडीअडचणी बाबत लवकरच शासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन प्रश्नाबाबत चर्चा करून मार्ग काढू.
मागील १५वर्षात राजकीय घडामोडी घडल्याने यात काही प्रमाणात विस्कळीतपणा आला. २०१४ ते२०१९ दरम्यान जातीयवादी विचारसरणी सत्तेत आली. त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडी आली. या सरकारने कोरोनाच्या या संकटात जास्त निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च केला.
जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, शिराळा तालुक्यात गणेशोत्सव नंतर सविस्तर दौरा घेऊन पूर्वी प्रमाणे शिराळच्या काँग्रेसला गतवैभव मिळवून देऊ.
स्वागत व प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे वकिल रवी पाटील यांनी केले.
यावेळी शिराळा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका साळुंखे,यशवंत पाटील, विश्वास शिंदे,प्रा.कादर नायकवडी, राजू कुलकर्णी, प्रताप काळे,संपत पाटील,तुकाराम चव्हाण,पोपट कदम,रवींद्र कोकाटे,राजेंद्र माने,संजय नायकवडी, नंदकुमार शेळके उपस्थित होते.
0 Comments