BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तालुकास्तरीय पोषण आहार प्रमाणपत्र वाटप

 

चिखली ( ता.शिराळा ) येथे कार्यशाळेत महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना अश्विनी नाईक , वंदना ठोंबरे आदी ..

 शिराळा , ता .१२ : गरोदर माता व स्तनदा माता यांच्या पोषणामुळे भावी पिढी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम होईल असे मत जायंटस ग्रुपच्या अध्यक्षा प्रा . सौ वंदना ठोंबरे यांनी केले . पंचायत समिती शिराळा यांच्यावतीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत राबविण्यात आलेल्या तालुकास्तरीय पोषण अभियान कार्यशाळेत बोलत होत्या . यावेळी जिल्हा परिषद सदस्य अश्विनी नाईक , पंचायत समिती सभापती सौ वैशाली माने , उपसभापती बी . के.नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती . १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण आहार अभियान म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होत आह . गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी समतोल आहार अत्यंत गरजेचा आहे . ज्यामध्ये कार्बोदके , प्रथिने , मेद , जीवनसत्वे , खनिजे , पाणी व तंतुमय पदार्थ यांचे योग्य प्रमाण गरजेचे आहे . पोषणाचा कमतरतेमुळे अनेक रोग होऊ शकतात व कुपोषित बालके जन्मास येतात हे टाळावयाचे असेल तर गरोदर मातांना सर्व पोषण घटक मिळावेत . यासाठी जनजागृती तसेच प्रबोधन गरजेचे आहे . पोषणाचे वैद्यकीय दृष्ट्या महत्त्व आणि आरोग्याच्या समस्या व उपचार यावर डॉ . नीलम ठोंबरे यांनी मार्गदर्शन केले . यावेळी सरपंच राजेंद्र नाईक , बालविकास विकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले , पर्यवेक्षिका विद्या पाटील , मनीषा पाटील , जानकर , वंदना घोडे , उपस्थित होते .


अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments