BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोयना धरणातून 38,631व वारणा धरणातून 8205 क्युसेस पाण्याचा विसर्ग

 

 सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दिनांक 13 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11.00 वाजल्यापासून 38 हजार 631 क्युसेस विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. सध्या  आयर्विन पुलाची पाणी पातळी 11 फूट इतकी असून त्यामध्ये वाढ होवून उद्या दिनांक १४ सप्टेबर २०२१ रोजी साधारणपणे २५ फूटापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे. अफवांवर विश्वासू ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे. 

सध्यस्थितीतीत धरणातील पाणीसाठा व विसर्गाचा माहिती पुढीलप्रमाणे- कोयना धरण आजचा पाणीसाठा 104.49 धरण भरलेली टक्केवारी 99.28, विसर्ग (क्युसेस)38631, वारणा धरण आजचा पाणीसाठा 34.36 धरण भरलेली टक्केवारी 99.88, विसर्ग (क्युसेस) 8205, धोम धरण आजचा पाणीसाठा 12.41 धरण भरलेली टक्केवारी 91.93, विसर्ग (क्युसेस)620, कन्हेर धरण आजचा पाणीसाठा 9.70 धरण भरलेली टक्केवारी 96.04, विसर्ग (क्युसेस)24, उरमोडी धरण आजचा पाणीसाठा 8.75 धरण भरलेली टक्केवारी 87.85, विसर्ग (क्युसेस)300, तारळी धरण आजचा पाणीसाठा 5.54 धरण भरलेली टक्केवारी 94.70, विसर्ग (क्युसेस)3103 धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरु राहील्यास धरणामधील आवक वाढल्यास विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233/2301820,2302925 या क्रमांकावर संपर्क साधावा.


अल्पावधीत शिव न्यूज या शिराळा तालुक्यातील स्थानिक घडामोडीना पाहिले प्राधान्य देणाऱ्या वेब पोर्टलला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार न मानता आम्ही आपल्या ऋणात कायम राहील.

शिव न्यूजने २१ लाख वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे. आता पंचवीस लाखाकडे वाटचाल सुरू आहे. त्या निमित्त सर्व वाचकांच्यासाठी

आपल्या परिसरात घडणाऱ्या सर्व घटना यांची माहिती मिळतेच पण त्याच बरोबर आपल्या तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा,शासकीय,निमशासकीय कार्यालये,पर्यटन स्थळे या बाबत आपल्या घरातील लोकांना व मुलांना किती माहिती आहे.समजा माहीती नसेल तर ती अचूक माहिती कुठे मिळेलं. त्या माहितीच्या आधारे आपल्या मुलांच्या व कुटुंबाच्या ज्ञानात भर कशी पडेल याच हेतूने गणेशोत्सवा निमित्ताने आम्ही शिव न्यूजच्या माध्यमातून शिव सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. यात असणारे सर्व प्रश्न हे आपल्या तालुक्यातील असतील.त्यासाठी चार पर्याय ही दिले आहेत. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असून एकूण ५० प्रश्न आहेत. या स्पर्धेत एका कुटुंबातील किती ही व्यक्ती सहभागी होतील. प्रत्येकाने आपला स्वतंत्र फॉर्म भरणे गरजेचे आहे.

प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न पाठविला जाईल. त्याचे उत्तर पुढील आठवड्यात शुक्रवारी दिले जाईल. शिव न्यूज मध्ये येणाऱ्या बातम्यांच्या मधील काही प्रश्न असतील.त्या वाचा आणि बिनधास्त उत्तरे द्या.

आपल्या तालुक्यातील घडामोडींची माहिती आपणाला असावी हाच या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.

सहभाग प्रमापत्र मिळवण्यासाठी कमीत कमी २० प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे.

आपण या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर शिव न्यूजच्या या शिव न्यूज सामान्यज्ञान स्पर्धा या व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.म्हणजे आपणाला ग्रुपवर इतर माहिती पाठवता येईल व आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल.

Post a Comment

0 Comments