BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पोषण आहाराचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा - प्राजक्ता कोरे

 

शिव सामाऩ्यज्ञान स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका दिड व एक हजाराचे बक्षीस

शिराळा:पोषण आहाराचे महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा.असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले. 

शिराळा येथील शेतकरी बचत भवनमध्ये एकात्मिक बाल विकास  अभियानांतर्गत तालुकास्तरीय पोषण आहार मेळाव्यात बोलत होत्या.  जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी,   गटविकास अधिकारी संतोष राऊत, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कोरे  म्हणाल्या, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने सुरू असलेले, पोषण अभियान यशस्वी करण्यासाठी,  पोषण आहाराचे महत्व सर्वसामांन्य लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्या जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण व माता मधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करायचे असेल, तर सकस आहाराची आवश्यकता आहे.  त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. हे जनजागृती चे काम अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.यावेळी कोरे यांनी अनुराधा देशपांडे लिखित पथनाट्याचे सादरीकरण आणि  व प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण पाककृती बद्दल सर्वांचे कौतुक केले.

शिव सामाऩ्यज्ञान स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका दिड व एक हजाराचे बक्षीस


या मेळाव्यास जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी,   गटविकास अधिकारी संतोष राऊत,गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, प्रकल्प अधिकारी सतीश नवले ,सारिका पाटील,डॉ. मनीषा यादव, शैलजा काकडे,अनुराधा देशपांडे ,मनीषा पाटील,विद्या पाटील, संगिता जानकर ,अरुण पाटील उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments