BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मालदनच्या शेखर काळे यांना समाजगौरव पुरस्कार प्रदान

 

 कराड तालुक्यातून प्रकाशित होणाऱ्या तिरंगा रक्षक वर्तमानपत्राच्या आणि आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा समाज गौरव पुरस्कार  मालदन (ता. पाटण)  येथील युवा साहित्य समाज सार्वजनिक वाचनालय तर सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार मालदन येथील शेखर काळे यांना प्रदान करण्यात आला.      

           मालदन येथील युवा साहित्य समाज वाचनालयाच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.प्रत्येक वर्षी हा पुरस्कार विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि त्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचा सन्मान या निमित्ताने केला जातो. चालू वर्षी वाचनालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामकाज केल्याबद्दल मालदन येथील युवा साहित्य समाज वाचनालय या वाचनालयाचा तसेच अध्यात्मिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असलेल्या गौरव म्हणून शेखर काळे यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार तिरंगा रक्षक चे संपादक आणि आदर्श माता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते मालदन चे माजी सरपंच अनिल सपकाळ केसे ग्रामपंचायतीचे सदस्य आनंदराव बडेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

यावेळी सत्करमूर्ती शेखर काळे म्हणाले, खऱ्या असताना सत्काराची अपेक्षा करणे गैर असून सत्काराच्या अपेक्षेने कोणीही सामाजिक काम करूच नये, तरीही आपुलकीने कोण कौतुकाची थाप पाठीवर ती टाकत असेल तर ती मात्र आपलेपणाने स्वीकारली पाहिजे, म्हणून हा माझ्या जन्मभूमीत माझ्या जन्मभूमीतील वृत्तपत्र आणि संस्थेने माझा सन्मान केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे.

  यावेळी युवा साहित्य समाजमंडळाचे अध्यक्ष सुहासराव काळे,युवा साहित्य समाज वाचनालयाचे संजय शिवाजीराव काळे, मालदनचे माजी सरपंच अनिल सपकाळ, उद्धवराव काळे, दिपकराव इंगवले, सूर्यकांत काळे, राहुल साळुंखे, हेमंत काळे, सचिन काळे, निलेश काळे, अमित देशमुख, संजय काळे, बाळासो काळे,पाडळी (केसे) गावचे ग्रामपंचायत सदस्य आनंदराव बडेकर,  आदर्शमाता प्रतिष्ठानचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष जावेद मुजावर, युवा नेते अरुण जाधव सह मालदन गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments