BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा नागपंचमीच्या मानाच्या पालखीची ही आहे अखंड परंपरा...


 

प्रणव महजन/शिराळा

गोरक्षनाथ महाराजांनी इसवीसन आठव्या शतकात शिराळ्यात वास्तव्यास असताना जीवंत नागाच्या नागपंचमीची परंपरा सुरू केली. हि परंपरा दशग्रंथी ब्राह्मण महाजन (सध्या पांडुरंग लक्ष्मण महाजन) यांचे घरापासून सुरु झाली. आजही परंपरागत नागदेवतेची पालखी पांडुरंग महाजन यांच्या घरातून निघत. या पालखीची तयारी आठ दिवस आधीपासून सुरू होते. 

शिराळा ग्रामदेवतेचे पुजारी गुरव अमावसेच्या दिवशी मूर्तीची लिंबू, माती आणि राख यांच्या सहाय्याने स्वच्छता करतात. त्यानंतर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भास्कर महाजन मूर्ती ब्रासो वापरून स्वच्छ, चकचकीत करतात आणि त्याला ठरलेल्या मनमोहक रंगांनी रंगवतात. नागपंचमीच्या दिवशी परंपरागत पालखी भोई बांधव कडून तोरणा ओढ्याला स्वच्छ धुतली जाते . त्यानंतर पालखीची सजावट पारंपरिक वस्त्रालंकारांनी केली जाते. 

सकाळी अकरा वाजता पालखीचे मनोभावी मंत्रोपचार ने विधिवत पूजा केली जाते. आधी जिवंत नागाची पुजा करण्याची परंपरा होती, पण सध्या फक्त मूर्तीची पूजा केली जाते. यानंतर पालखीचे मानकरी पांडुरंग महाजन यांच्या घरी प्रथम पूजन पूर्ण होते. यानंतर गुरुवार पेठ मार्गे पालखी सोमवारपेठेतील मरीमीआईच्या मंदिरात  प्रथम पूजे साठी जाते. त्यानंतर ग्रामदैवत अंबाबाईच्या मंदिरात पालखीची पूजा होते.

 सायंकाळी पालखी कासार गल्ली मार्गे, वैजेश्वर मंदिरात जाते, तिथे तिचे पूजन होते आणि रात्री उत्तर पूजेसाठी पालखी परत पांडुरंग महाजन यांचे घरी येते. शिराळा गावातील या परंपरेमध्ये सर्व समाजाने बारा बलुतेदारांना सहभागी होण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी उचलण्याचा मान भोई लोकांचा आहे, नागाचा मान कोतवालांचा आहे, काकड आरतीचा मान काकडे चा आहे, पालखी आणि नागाची पूजा करून नागपंचमीची सुरुवात करण्याचा मान महाजनांचा आहे. पालखीमधील नागदेवतेची मूर्ती ही जागृत देवस्थान आहे. आणि नवसाला पावण्याची अखंड परंपरा गेली कित्येक वर्ष सुरू आहे.

Post a Comment

0 Comments