शिराळा : कापरी ( ता.शिराळा ) हद्दीतील एका फार्महाऊस मध्ये मडकी , पोते , पिशवी मध्ये बंदीस्त करून ठेवलेल्या १ ९ नागांना वनविभागाने कारवाई करून जप्त करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.याबाबत वनविभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत समजलेली माहिती अशी , निनावी दूरध्वनी वरून १ ९ २६ हेल्पलाईनवर कापरी हद्दीतील फार्महाऊस मध्ये नाग बंदिस्त करुन ठेवले असल्याची माहिती मिळाली . त्याचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली . त्यामुळे ही माहिती मिळताच शिराळा येथील वनक्षेत्रपाल , वनपाल , वनरक्षक , वनमजूर व सांगली येथील वनविभागाचे फिरते पथक आणि मानद सचिव रक्षक पथकाने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली.त्यावेळी काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेलेत . आत जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी मडकी , पोती , पिशवीत ठेवलेले १ ९ नाग आढळून आले.त्यावेळी कारवाई करणाऱ्या पथकाने त्या १ ९ जिवंत नागांना जप्त केले . त्या जप्त केलेल्या नागाची वैदयकीय तपासणी इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत करण्यात आली आहे . त्यानंतर सायंकाळी त्या नागांना नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले . याबाबत वनविभागाने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी हे करीत आहेत.या कारवाईमुळे शिराळा येथे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे .
0 Comments