BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीतून विसर्ग कमी केल्याने या दोन पुलावरून वाहतूक सुरू


 चरण :(ता.शिराळा)  चांदोली धरणातून विसर्ग कमी केल्याने वारणा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागल्याने दोन दिवस पाण्याखाली गेलेल्या चरण-सोंडोली पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.

शिराळा: चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने २४ तासात ७मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.धरणातून  सिडलेला १४३७९विसर्ग कमी करून ८७२४ ने सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागल्याने पाण्याखाली गेलेले शित्तुर-आरळा व चरण सोंडोली हे पूल मोकळे झाल्याने दुपार पडून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.

सध्या धरणाच्या सांडव्यातून ७८९१ तर विद्युत निर्मितीतून८३३ असे एकूण ८७२४कुसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात आहे.त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत कमी होऊ लागली आहे.

धरणाच्या पाण्याची पातळी ६२२.४० मीटर असून धरणात २९.८१ टी. एम.सी. म्हणजे ८३.२९ टक्के पाणीसाठा आहे. चांदोलीत २४ तासात ७ तर एकूण २२५८ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.

Post a Comment

0 Comments