BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोरोनाच्या काळात आशा स्वयंसेविकांचे काम महत्वपूर्ण-विराज नाईक

 

शिराळा  ः कोराना विषाणू संसर्ग काळात आशा स्वयंसेविकांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे प्रतिपादन सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले. 

शिरशी (ता. शिराळा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रतील आशा स्वयंसेविकांनी कोरोना विषाणू संसर्ग काळात चांगले काम केल्याबद्दल शिराळा तालुका कामगार परिषदेमार्फत जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

जिल्हाध्यय नाईक म्हणाले, प्रारंभीचा कोराना विषाणू संसर्ग काळ अत्यंत धोकादायक होता. या विष्णूवरचा कोणताही उपचार पृथ्वीतलावर अवगत नव्हता. त्याबाबत नेमकी माहिती मिळत नव्हती. या काळात आशा स्वयंसेविकानी त्यांना दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने काम करून पार पाडली. लोकांच्या घरोघरी पोहचून तपासण्या करणे, माहिती गोळा करणे, आवश्यक काळजीबाबत उपाय-योजना सांगण्याचे काम केले आहे. त्यांच्याबरोबर वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, बचत गट मदतनिस आदी यंत्रणांनीनी आपापली जबाबदार पार पडल्याने कोरोनाचा प्रर्दभाव रोखू शकलो. 

प्रारंभी विलास पाटील यांनी स्वागत केले. कामगार परिषदेचे तालुकाध्यक्ष मारुती रोकडे यांनी प्रस्ताविक केले. सरपंच एम. बी. भोसले, उपसरपंच सर्जेराव भोसले, आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. उत्तम शिंदे, डॉ. शलाका थोरात, माजी पोलीस निरीक्षक बापूसाहेब जाधव, शंकर भोसले, महादेव रोकडे, अशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments