BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्ह्यातील पूरबाधितांना मदतीची प्रक्रिया सुरू

सांगली, दि. 18, (जि. मा. का.) : माहे जुलै २०२१ मध्ये आलेल्यास महापुरामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज, पलुस, वाळवा, शिराळा या तालुक्यासतील जी कुटुंबे महापुराचे पाणी घरात येऊन बाधीत झाली आहेत अशा प्रत्येक कुटुंबाला रू.१००००/- प्रमाणे मदतीची प्रक्रिया सुरू झाली असून उर्वरित कुटुंबांना मदतीसाठी अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. 

    यामध्ये शिराळा तालुक्यातील ७३६ पूरबाधीत कुटुंबांच्या बॅंक खात्यांवर रुपये ७३ लाख ६० हजार इतकी रक्कम जमा करणेत आली आहे. 

वाळवा तालुक्यामध्ये, अपर आष्टा तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पूरबाधीत कुटुंबांना अनुक्रमे ३ कोटी ६० लाख, १ कोटी २३ लाख  प्रमाणे अनुदान वाटप करण्यासाठी बॅंकेत जमा करण्यात येत आहे. सदर रक्कम २ दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.         

      पलुस तालुक्यामध्ये , अपर तहसिलदार सांगली ग्रामीण क्षेत्रामध्येे , मिरज तहसिल ग्रामीण क्षेत्रामध्ये, सांगली मिरज महापालीका क्षेत्रामध्ये अनुक्रमे ४ कोटी ७९ लाख १० हजार, ३ कोटी ११ लाख, ५३ लाख ३० हजार ९ कोटी ७३ लाख  एवढे अनुदान येत्या दोन ते तीन दिवसांत बॅंकेमध्ये  जमा होत असुन लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.

     अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण २२ हजार ९९४ बाधीत कुटुंबांच्या खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम जमा होईल. याचबरोबर उर्वरीत बाधीत कुटुंबांना अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत शासनाकडे अनुदान मागणी करण्यात आलेली आहे. अशीही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे. 

Post a Comment

0 Comments